leopard attack  saam tv
महाराष्ट्र

Leopard: मांगरुळकरांत 'बिबट्या' ची दहशत; डोंगररांगा परिसरातील शेतकरी धास्तावला

वनविभागाने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासह ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

विजय पाटील

सांगली : अलिकडील काही दिवसांमध्ये सांगलीच्या (sangli) शिराळा (shirala) तालुक्यात बिबट्याचे (leopard) वारंवार हल्ले होऊ लागल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. शेतकऱ्यांना (farmers) बिबट्या शेतात सारखा नजरेस येत आहे. तग धरून रात्री मंगरूळ येथे एका शेतात बिबट्या बसल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. (sangli latest marathi news)  

शिराळा (shirala) तालुक्यातील 'तडवळे' गावातही ऊसतोड मजुराच्या पाच वर्षीय बालकावर हल्ला करून बालकास जखमी केले होते. मजुरांनी आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकल्याने बालकाचे प्राण वाचले होते. दोन दिवसांपुर्वी युवकांवरही बिबट्याने शेत शिवारात हल्ले केले होते. खांडेकरांच्या वस्तीवर हल्ला करुन दोन मेंढ्या जागीच ठार केल्या होत्या.

मांगरुळ -चांदोली मुख्य रहदारी रस्त्याच्या खांडेकर-पाटील यांच्या 'सोनार टँक' परिसरात मुख्य रहदारी रसत्यालगत असणाऱ्या दोन्ही 'पिंजरांच्या' होळींमध्ये बिबट्या रात्री अकरा-साडेअकराच्या दरम्यान दबा धरुन बसला होता. परिसरात बिबट्याचे ग्रामस्थांना होणारे दर्शन, हल्ले यामुळे बहुतांशी ग्रामस्थ धास्तावल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासह ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT