दिशा सॅलियनला पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन वाझेची?; नितेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झालं नाही अंस दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई - काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सॅलियनच्या मृत्यूसंबंधी बोलताना काही गंभीर आरोप केले होते. दिशा सॅलियनची (Disha Salian) हत्या करण्यात आली असून हत्येआधी बलात्कार देखील करण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला होता. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आता दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचे नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ उडाली आहे.

ट्विट करत ते म्हणाले की, “दिशाला आठ तारखेच्या रात्री (8 जून 2020 – दिशा सालियानच्या मृत्यूचा दिवस) ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात 9 जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन?” अशी शंका नितेश राणेंनी उपस्थित केली आहे.

पुढे अजून एक ट्विट करत ते म्हणाले की, "मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे? हे किती योग्य आहे? नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?,” असा सवाल नितेश राणेंनी केली आहे.

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि त्या दिवशी रात्री उपस्थित असणारा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल देखील राणे यांनी ट्विट करत विचारला आहे.

तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झालं नाही अंस दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे,” असं ट्विट देखील नितेश राणे यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com