Veer Jawan Tujhe Salaam: सांगलीच्या सुपुत्रास अखेरचा निराेप; हुतात्मा रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अत्यंत शोकाकुल वातावरणात अमर रहे अश्या घोषणा देत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Martyr Jawan Romit Chavan Last Rites In Sangli
Martyr Jawan Romit Chavan Last Rites In Sanglisaam tv
Published On

सांगली : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे १९ फेब्रुवारीस आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिगाव (sangli) येथील रोमित तानाजी चव्हाण (martyr jawan romit tanaji chavan) यांना वीरमरण आले. शिगाव गावातुन अंत्ययात्रा वारणा नदी काठी आली. वारणा नदीकाठी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात अमर रहे अश्या घोषणा देत अंत्यसंस्कार करण्यात आले. (Martyr Jawan Romit Chavan latest marathi news)         

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) म्हणाले अत्यंत धाडसी असे रोमित होते. आतंकवाद्यांना प्रतिउत्तर देताना रोमित यांना वीरमरण आले आहे. अतिशय कष्टातून रोमित हे सैन्य दलात सहभागी झाले हाेते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. राेमत यांचा आम्हाला अभिमान आहे.

Martyr Jawan Romit Chavan Last Rites In Sangli
Martyr Jawan Romit Chavan Last Rites In SangliSaam Tv

देशासाठी आपल्या प्राणाची बाजी शेतकरी कुटुंबातील जवनाने लावली. आई वडिलांनी देशासाठी आपला मूलगा समर्पित केला. शेतकरी देशाला खायला घालण्यासाठी कष्ट करत आहे. आणि देशाचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे. रोमित यांना वीरमरण आले आहे. राज्यातील शेतकऱ्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावना माजी मंत्री सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Martyr Jawan Romit Chavan Last Rites In Sangli
Martyr Jawan Romit Chavan Last Rites In Sanglisaam tv
Martyr Jawan Romit Chavan Last Rites In Sangli
Satara: गोडोली तळे सुशोभीकरण, किल्ले अजिंक्यतारासाठी निधी द्या : राजेंची मंत्री ठाकरेंकडे मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com