Bacchu Kadu news  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Bacchu kadu : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर रेल्वे बंद करू असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला. ते नागपुरात बोलत होते.

Vishal Gangurde

नागपूरमध्ये हजारो शेतकरी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीसाठी ठाण मांडलंय

कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास बच्चू कडू यांनी 31 ऑक्टोबरला रेल रोको आंदोलनाचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांची या संदर्भात बैठक होणार

पराग ढोबळे, साम टीव्ही

बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील मोर्च्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जमाफीसाठी हजारो शेतकरी नागपुरात ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर ३१ तारखेला रेल्वे बंद करू, असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.

माजी मंत्री बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत नागपुरात पोहोचले आहेत. त्यांनी नागपुरात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी थेट रस्त्यावरच आंदोलनाला सुरुवात केली आहे. या मोर्चात शेतकऱ्यांशी संवाद साधताना फडणवीस सरकारला रेल्वे बंद करू, असा इशारा दिला.

'कर्जमाफीची तारीख मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी घरी जाऊ नये, असंही बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला आहे. एका बातमीवरुन न्यायालयाने आदेश दिले. मात्र शेतकरी रोज मरत आहे. त्याचा विचार कोणी करत नाही. आम्ही हटायला तयार आहे, मात्र पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये न्यावे. पोलिसांनी जेलमध्ये व्यवस्था करावी, आम्ही न्यायालयाचा मान ठेवून जायला तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बच्चू कडू करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत कर्जमाफीसह इतर मुद्द्यावर उद्या बैठक होणार आहे. मात्र, आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास 31 तारखेला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं बच्चू कडू यांना समर्थन

मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जालन्यातील महाकाळा येथील राहत्या घरून मनोज जारंगे पाटील हे नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gossip: गॉसिप सकारात्मक असू शकतं; वैज्ञानिकांनी सांगितलं गॉसिपचं ‘गुड साइड’

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

मराठवाड्यात फक्त 98 कुणबी दाखले, कुणबी दाखले, कुणी रखडवले?

Maharashtra Live News Update: बीडमध्ये डिझेलच्या टँकरचा अपघात झाल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी

पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताला रंगेहाथ सापडला; पोलीस विभागात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT