Marathavada Farmer Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Farmer : मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या; 3 महिन्यांमधील धक्कादायक आकडेवारी उघडकीस

आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जास्त व्याज दराने सावकारी कर्ज घ्यावे लागले.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Farmer :मराठवाड्यात यावर्षीच्या तीन महिन्यात तब्बल 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या आकडेवारीवरून दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत असल्याचं समोर आलं आहे. मराठवाड्यातील 40 टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नव्हती. तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जास्त व्याज दराने सावकारी कर्ज घ्यावे लागले. (Marathi News)

खताला जीएसटी लावून सबसिडी कपात करण्यात आली आहे. कापसाला भाव मिळत नाही तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. सोयाबीनने फटका दिला आहे. या सर्व अडचणींसह महिन्याभरापासून अवकाळी आणि गारपिटीने रब्बी पिक उद्धवस्त झाले आहे.

या वेगवेगळ्या समस्येमुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात आहेत. त्यामुळे दिवसागणिक शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी होत नसून तो वाढतच चालला आहे. सर्वाधिक 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.

2023 मधील 3 महिन्यात मराठवाड्यातील 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.

छत्रपती संभाजीनगर - 23

जालना - 15

परभणी - 18

हिंगोली - 05

नांदेड - 31

बीड - 65

लातूर - 14

धाराशिव - 43

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आणखीन वाढत चालले आहे. सतत नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. मात्र सरकार फक्त आश्वासन देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या घडीला विविध क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक तरुण मंडळी शेती व्यवसायाकडे वळण्याचा विचार करत आहेत. मात्र शेती व्यवसायामध्ये देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अशी धक्कादायक आकडेवारी राज्यासाठी गंभीर बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT