Swabhimani district president slaps bank manager in Khamgaon 
महाराष्ट्र

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

Swabhimani Leader Slaps Bank Manager Video Viral : शेतकरी कर्जमाफीबाबत चौकशी करण्यासाठी बँकेत आले असताना वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याच वादादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला.

Bharat Jadhav

  • बुलढाण्यातील खामगावमधील एका बँकेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वाद.

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार.

  • शेतकऱ्याच्या वडिलांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप.

महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली. कर्जमाफी योजनेचा लाभ आपल्याला मिळाला की नाही हे जाणून घेण्यासाठी शेतकरी बँकेत विचारपूस करत आहेत. मात्र याचदरम्यान बँक कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची आणि वाद होत असल्याचं दिसत आहे. अशाच एक किस्सा बुलढाण्यातील खामगावातील एका बँकेत झाला. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षांनी थेट बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावलीय.

कर्जमाफीची विचारपूस करणाऱ्या शेतकऱ्याला अरेरावीची भाषा करत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्याला बँकेच्या मॅनेजरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने चपराक लगावलीय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं सेंट्रल बँकेच्या शाखेत हा प्रकार घडलाय. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील हे खामगाव येथील सेंट्रल बँकेमध्ये गेले होते. त्यांनी कर्जमाफी योजनेबद्दल विचारणा केली होती.

त्यावेळी कर्जमाफीची विचारपूस करण्यासाठी जाणारा शेतकऱ्यांना उडावीउडवीची उत्तरे दिली. बँक मॅनेजरने थेट शेतकऱ्याचा बाप काढला त्यामुळे आपण त्यांना मारहाण केली स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष अमोल पाटील याप्रकरणी म्हणालेत. "शेतकऱ्यांचा बाप कसा काढला, असं विचारत अमोल पाटील यांनी सेंट्रल बँकेच्या मॅनेजरच्या कानाखाली मारली. कर्जमाफीच्या यादीबाबत विचारपूस करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना बँक मॅनेजर शिवाजी कड यांनी बाप काढल्याचा आरोप स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केलाय.

"वारंवार तुम्ही बँकेत कशाला येता बँक काय तुमच्या बापाची आहे का? अशा भाषेत शेतकऱ्यांना हिणवलं. ही लोक शेतकऱ्यांना ५ लाख रुपये भरायला लावत आहेत. शेतकऱ्यांना म्हणताय तुमच्या बापाची बँक आहे का, शेतकऱ्यांचा बाप काढणारे हे कोण? शेतकऱ्यांशी उर्मट वागल्यानं आपण त्यांना चोप दिला असं अमोल पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना असाच त्रास देत राहिले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही अमोल पाटील यांनी यावेळी दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT