Leopard Saam Tv
महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार; नाशकात भीतीचे वातावरण

महिनाभरानंतर बिबट्याच्या हल्ल्यात हा दुसरा बळी गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार झाल्याची घटना तालुक्यातील गिरणारे येथे घडली आहे. गेल्या दाेन तीन दिवसांपासून हा मजूर बेपत्ता हाेता. मात्र, साेमवारी शेतातील उसाच्या मळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला.अरुण हिरामण गवळी असे मृत्यू झालेल्या विकतचे नाव आहे. या भागात पुन्हा शेतमजुरावर बिबट्याने झडप घेत फडशा पाडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. महिनाभरानंतर बिबट्याच्या हल्ल्यात हा दुसरा बळी गेला आहे.

हे देखील पाहा -

हरसूल येथील रहिवाशी असलेले शेतमजूर गिरणारे पंचक्रोशीत रोजंदारीने शेतीच्या कामासाठी मुक्कामी स्थलांतरीत झाले आहेत. येथील टमाटा मार्केटच्या मागे असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट्याने अरुण गवळी या मजुरावर दोन दिवसांपुर्वी हल्ला केला. या हल्ल्यात अरूणचा मृत्यू झाला. तो दोन दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे सर्वच त्याला शोधत होते.

दरम्यान, साेमवारी सकाळी येथील शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती कळताच वनपरिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे, ग्रामीण पोलीस, वनपथक घटनास्थळी दाखल झाले. अन्य शेतमजुरांनी हा मृतदेह अरूणचा असल्याचे ओळखले. पोलीस, वनविभागाने पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro 9: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंचा नवीन मेट्रोतून प्रवास| VIDEO

Beetroot Raita Recipe: दुपारच्या जेवणाची चव वाढवेल बीटाचा रायता, फक्त १० मिनिटांत झटपट बनवा

Chanakya Niti: आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतंय? मग चाणक्यांचे हे ४ सल्ले वाढवतील तुमचे मनोबल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार? १३ एप्रिलला महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra News Live Update: भाजपकडून राजकीय द्वेषापोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन; बाजार समिती संचालक मंडळांचा आरोप

SCROLL FOR NEXT