Manasvi Choudhary
महाराष्टीयन पदार्थामध्ये जेवणाच्या ताटात रायता वाढला जातो. रायता केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे.
अनेक भाज्यांपासून तुम्ही घरच्या घरी रायता रेसिपी बनवू शकता. आज आम्ही बीटारा रायता कसा बनवायचा? हे सांगणार आहे.
बीटाचा रायता बनवण्यासाठी बीट, लाल मसाला, जिरा पावडर, पुदीना पाने, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी बीट स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करा. गॅसवर एका भांड्यामध्ये बीटाचे तुकडे शिजवून घ्या.
एका भांड्यामध्ये दही घ्या त्यात जिरा पावडर, लाल मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. संपूर्ण मिश्रण नीट मिक्स करा.
ं
या मिश्रणात उकडलेले बीटाचे तुकडे मिक्स करा. पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण एकजीव करा
बीटाचा रायतामध्ये बारीक चिरलेली पुदीना आणि कोथिंबीर घाला म्हणजे चांगली चव येईल. अशाप्रकारे तयार बीटाचा रायता थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.