Without Farmer ID farmers cannot avail benefits of 6 major government schemes; Know complete details and application process. saam tv
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो! Farmer ID नसेल तर नाही मिळणार 6 योजनांचा लाभ, काय असते Farmer ID, कसा मिळवायचा?

Farmer ID : सरकारच्या सहा प्रमुख योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय, ते का महत्त्वाचे आहे, पात्रता आणि अर्ज कसा करायचा याची माहिती जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • Farmer ID नसल्यास 6 सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही

  • राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांसाठी Farmer ID अनिवार्य

  • ओळख पडताळणी, थेट लाभ हस्तांतरणासाठी Farmer ID महत्त्वाची

शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आर्थिक सक्षम बनवणं असतं. शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवा यासाठी फॉर्मर आयडी देण्यात येत आहेत. जर शेतकऱ्यांकडे फॉर्मर आयडी नसेल तर त्यांना सरकारच्या ६ योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हे ओळखपत्र आवश्यक आहे.

आता तुम्ही म्हणाल हा फॉर्मर आयडी कसा मिळवायचा. तर घाबरू नका आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती या लेखात देत आहोत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा Farmer ID न काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Farmer ID काढणे अत्यावश्यक आहे.

Farmer ID म्हणजे काय?

Farmer ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा एक ओळख क्रमांक आहे. या कार्डशी आधार, सातबारा उतारा, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक जोडण्यात आलेले असतात. या ओळखीच्या आधारे शेतकऱ्याची जमीन, पीक, पीक पद्धत आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवता जात असतो. यामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होते.

Farmer ID नसेल तर शेतकऱ्यांना महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळणार नाहीये. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. यासह पीक विमा योजना, महाडीबीटीवरील अनुदान योजना, कर्ज व व्याज सवलत योजना, आपत्ती नुकसान भरपाई, पीक खरेदी व हमीभाव योजनांचाही लाभ मिळणार नाही. कर्जमाफी किंवा व्याज अनुदान हवे असल्यास शेतकऱ्यांना या कार्डचा मोठा फायदा होईल. शिवाय बँकांना शेतकऱ्यांची माहिती पडताळणी करणे सोपे होणार आहे.

Farmer ID मुळे बनावट लाभार्थ्यांना रोखता येईल. योजनांमध्ये पारदर्शकता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल, असा सरकारचा दावा आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा एकत्र उपलब्ध झाल्याने भविष्यात नवीन योजना आखणे सोपे होणार आहे.

Farmer ID कुठे मिळेल?

Farmer ID ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून काढता येते. आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

SCROLL FOR NEXT