Yavatmal district
Yavatmal district Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal Farmer News : यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी, आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यानं संपवलं जीवन

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

Yavatmal News : जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिन्यात राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचा मोठं नुकसान झालं. यवतमाळ जिल्ह्यात 21 व 27 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी महागाव तालुक्यातील तिवरंग येथील शेतकरी ठरला आहे. नामदेव संभाजी वाघमारे (वय ५२) या शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 34 शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन केले आहे.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःच्या नावाने तीन एकर शेती आहे व त्यांना तीन अपत्य आहे. त्यांच्यावर खाजगी आणि शासकीय असे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचा कर्ज होते. सततच्या नापिकेने आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मुलाने दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT vs BJP: मतदान केंद्रावरच ठाकरे गट आणि भाजप एकमेकांना भिडले!

Maharashtra Lok Sabha Voting Live: नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik News: नाशकात भाजप-ठाकरे गट आमने-सामने, फरांदे आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

HSC Result Update | या वेबसाईटवर 12 वी निकाल पहायला मिळेल!

Lok Sabha Election 2024 : जे मतदान केंद्रावर ६ पर्यंत उपस्थित, त्या सर्वांना बजावता येणार मतदानाचा हक्क; निवडणूक आयोग

SCROLL FOR NEXT