तहसील कार्यालयावर गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या ! 
महाराष्ट्र

तहसील कार्यालयावर गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या !

नांदेड जिल्ह्य़ातील लोहा तहसिलच्या इमारतीवर चढून एका 43 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे.

संतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड : नांदेड Nanded जिल्ह्य़ातील लोहा तहसिलच्या इमारतीवर चढून एका 43 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे. Farmer commits suicide by hanging himself at tehsil office

भिमराव शिरसाठ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच नाव आहे. आज शनिवारची शासकीय सुट्टी असल्याने तहसिल कार्यालयात कुणीही नव्हते. याचाच फायदा घेऊन भिमरावने तहसिल कार्यालयाच्या इमारतीवर चढून दोरीने गळफास घेतला आहे.

हे देखील पहा-

भिमराव शिरसाठ हे उमरा येथील रहिवासी आहेत. त्यांना केवळ एक एकर शेती आहे. दोन वर्षांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. या आजारातून बरा झाल्यानंतर भिमरावने अपंगाचे प्रमाणपत्र मिळवले. यामुळे ते संजय गांधी निराधार योजनेतून अनुदान मिळविण्यासाठी तहसील मध्ये प्रयत्न करत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. Farmer commits suicide by hanging himself at tehsil office

भिमरावला पत्नी, दोन मुली आहेत. आजाराने कर्जबाजारी झालेला आणि पैश्याच्या विवंचनेतून भिमराव ने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवांककडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी Police धाव घेत पंचनामा केला आहे. तर पोलिस पुढील कारवाई करत आहेत..

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT