वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी
वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी चेतन इंगळे

वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी

वसई विरार लसीकरणासाठी शासनाकडून 9000 कोशिल्ड आणि 1100 कोव्हक्सीनचा साठा महापालिकेला उपलब्ध झाल्याने आज तब्बल 21 लसीकरण केंद्रावर हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
Published on

चेतन इंगळे

वसई विरार : वसई विरार लसीकरणासाठी Vaccination शासनाकडून 9000 कोव्हीशिल्ड Covishield आणि 1100 कोव्हक्सीनचा Covaxin साठा महापालिकेला उपलब्ध झाल्याने आज तब्बल 21 लसीकरण केंद्रावर हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.. Crowd of citizens at Vasai Virar Municipal Corporations vaccination center

50 टक्के ऑनलाइन आणि 50 टक्के ऑफलाईन प्रमाणे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे एका केंद्रावर फक्त 100 ते 150 नागरिकांनाच लसीकरण करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लोकांसाठी केवळ 100 ते 150 लसी साठा उपलब्ध असताना 300 ते 400 नागरिकांच्या रांगा लसीकरण केंद्रावर पाहायला मिळत आहेत. या गर्दीमुळे आणखी कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी
हृदयद्रावक! 20 वर्षांच्या विवाहितेला महिलेला झाडाला उलटं बांधून मारहाण... (पहा व्हिडीओ)

तसेच रांगा लावून सुद्धा लस मिळत नसल्याने विरार पश्चिम विवा कॉलेज लसीकरण केंद्रावर नागरिकांनी संतप्त होत गोंधळ घातला आहे. ऑनलाइन किंवा ऑफ लाईन नोंदणी न झालेल्या नागरिकांना गर्दी न करण्याचे अहवान पोलिसांनी केले पण नागरिक मात्र प्रचंड गोंधळ करून लस मिळालीच पाहिजे अशी मागणी करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com