नाशिकच्या मिसळवाल्या आजींचे निधन Saam Tv
महाराष्ट्र

नाशिकच्या मिसळवाल्या आजींचे निधन

वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : चमचमीत मिसळीच्या Misal चवीने अनेकांना भुरळ पाडणाऱ्या नाशकातील प्रसिद्ध ‘सीताबाईची मिसळ’च्या Sitabai Misal आजींचे निधन झाले आहेत. सीताबाई मोरे Sitabai More ‘मिसळवाल्या आजी’ या नावाने प्रसिद्ध होत्या. मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीताबाईंच्या जाण्याने कुटुंबीयसह खवय्यांमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

सीताबाई मोरे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मिसळप्रेमींसह शहराच्या विविध भागांतील नागरिक उपस्थित होते. त्यांनी जवळपास ७५ वर्ष खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

हे देखील पहा -

नाशिकची मिसळ नगरी अशी ख्याती होण्यामागेही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.जुन्या नाशिक या छोट्याशा भागातून आजींनी आपल्या मिसळचा व्यवसायाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच आजींची ही मिसळ पूर्ण नाशकात प्रसिद्ध झाला होता.

आजींची मिसळ खाण्यासाठी अनेक लोकं वेगवेगळा भागातून येत होते. संपूर्ण शहरात त्यांच्या मिसळची चर्चा पसरल्यानंतर अल्पवधीत त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून पुढे आल्या. सध्या त्यांच्या नाशकात तीन शाखा आहेत. त्यामुळे सीताबाई मोरे यांच्या जवळच्या नातेवाईकांसोबतच मिसळप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahashivratri 2026 : महाशिवरात्री उपवासासाठी बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी फुड

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी

High Cholesterol: कोलेस्टेरॉल वाढण्याच्या महिनाभरआधी दिसतात ही 5 गंभीर लक्षणं, वेळीच व्हा सावध अन्यथा पडेल महागात

Pune Mayor Election: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड, RPI चे परशुराम वाडेकर उपमहापौर

Viral Video: डॉगेश भाईचा जलवा! थेट रिक्षाच्या छतावर बसून केला पुण्याच्या रस्त्यावर प्रवास, पाहा Video

SCROLL FOR NEXT