साताऱ्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि सोनार केरळ पोलिसांच्या रडारवर Saam Tv
महाराष्ट्र

साताऱ्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि सोनार केरळ पोलिसांच्या रडारवर

केरळ पोलिसांची साताऱ्यात धाड सत्र सुरूच...

ओंकार कदम

सातारा - साडेतीन किलो सोन्याच्या चोरी प्रकरणाची केरळ पोलिसांकडून Police सातारा Satara मध्ये तपास अद्याप देखील सुरूच आहे. इन्वेस्टीगेशन टीम मध्ये सर्कल इंस्पेक्टर राजीव, सब इन्स्पेक्टर शाहुल राधाकृष्णन दिलीप आणि राजीद स्पेशल इन्वस्तीगेशन टीम लीडर विश्वनाथन यांचा समावेश आहे. या टीमने संशयित आरोपी डॉक्टर निलेश साबळे आणि सुजित जगताप यांच्या शोधासाठी आणि तपासात इतर धागेदोरे शोधण्यासाठी सध्या साताऱ्यात धाड सत्र सुरू केले आहे.

या गुन्ह्यातील दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांना शोधण्यासाठी केरळ पोलीस साताऱ्यात सध्या ठाण मांडून आहेत. जोतिर्लिंग रिफाईनचे मालक सुजित जगताप यांच्या दुकानातील सोन्याची शुद्धता तपासण्याचे मशीन केरळ पोलिसांनी जप्त केले असून या घटनेचा कसून तपास सध्या केरळ पोलीस करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

केरळमधील Kerla एका बँकेचे Bank तीन कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने Gold Theft चोरीला गेले होते. सोने चोरल्याच्या गुन्ह्यात केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ऑगस्ट महिन्यात चार जणांना सातारा येथून ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींना केरळ येथे नेण्यात आले होते. यामध्ये मुख्य सूत्रधार निखिल जोशी आणि इतर तिघांची चौकशी केरळ पोलिसांनी केली होती मात्र मुख्य सूत्रधार सोडून तिघांचा या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे पोलिसांना समजल्यानंतर या तिघांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यानंतर निखिल जोशी हा केरळ चोरीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Cholesterol : पावसाळ्यात वाढतंय बॅड कोलेस्ट्रॉल, हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी खा 'ही' १ सुपरहेल्दी भाजी

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक

रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा नवा 'झोल'! मीटरमध्ये बसवले गुप्त डिव्हाइस अन् प्रवाशांच्या खिशावर मारला दरोडा

Metro 13 Mumbai: मीरा-भाईंदर ते वसई-विरार आता काही मिनिटांत; मेट्रोसह वाहनांसाठी नायगाव खाडीवर दुमजली पूल

High Blood Pressure And Tea: हाय ब्लड प्रेशरचे रूग्ण चहा पिऊ शकतात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT