Fake Marriage Racket Exposed In Aurangabad
Fake Marriage Racket Exposed In Aurangabad डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

Aurangabad: ५० पेक्षा अधिक लग्नाळुंना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाहा रॅकेट कसं चालायचं?

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा अधिक लग्नाळू तरुणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी लग्न लावून नवरीला हातोहात पसार करणाऱ्या एका महिलेला अटक केलीय. लग्न (Marriage) होत नसलेल्या युवकांना मुलगी दाखवणे, ती पसंत पडली की, मुलाच्या कुटुंबाकडून 1 ते 10 लाख रुपयांपर्यंत सौदा ठरवायचा, लग्न लावून द्यायचे, लग्नानंतर दोन-चार दिवसांमध्ये नवरीने दागिने घेऊन पळून जायचे. या पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या महिलेच्या टोळीने तब्बल 50 जणांपेक्षा अधिक युवकांची फसवणूक केल्याची माहिती दौलताबाद पोलिसांच्या तपासात उघड झालीय. (Aurangabad Fake Marriage Racket Exposed News)

हे देखील पाहा -

या टोळीचे महाराष्ट्रासह गुजरातमध्येही नेटवर्क आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यात 8 एप्रिल रोजी दाखल गुन्ह्यानुसार मावसाळा येथील युवकाचे 26 मार्च रोजी लग्न लावून दिल्यानंतर चौथ्या दिवशी नवरीने दौलताबाद किल्ला पाहण्याचा बहाणा करुन पळ काढला होता. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या दौलताबाद पथकाने केलेल्या तपासात या टोळीने 50 हून अधिक युवकांना फसवल्याचं समोर आलंय. पोलिसांनी त्यावेळी नववधूला सुरुवातीला अटक केली. तिच्या चौकशीत लग्न लावून देण्याऱ्या टोळीची प्रमुख ही जळगाव जिल्ह्यातील आशाबाई प्रकाश बोरसे असल्याचं सांगितलं होतं. त्यासोबत तिला लताबाई राजेंद्र पाटील हिने मदत केल्याचे स्पष्ट झाले. पोलीस दोघींच्या शोधात होते.

6 जुलै रोजी लताबाई जळगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दौलताबाद पोलिसांचे पथक जळगावला पोहोचले. त्यांनी लताबाईला ताब्यात घेतले. तिने टोळीची सूत्रधार आशाबाई असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक भडगावला पोहोचले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच आशाबाईने पळ काढला. पथक लताबाईला घेऊन दौलताबादला आले आहे. आता तिच्याकडून या फसवणुकीची संपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.

लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रिय का ?

राज्यात इतक्या तरुणांची फसवणूक होऊनही त्याची वाच्यता का केली जात नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, फसलेले अनेकजण बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रारी देत नाहीत. याचाच फायदा आशाबाई उचलत असल्याचेही आरोपींनी सांगितले. अनेकांना लग्नास मुली मिळत नाहीत. आशाबाई पसंत पडेल अशी मुलगी दाखवते. ठरलेल्या व्यवहारातील काही रक्कम मुलीला देते. तसेच मुलीची मावशी, मामासह इतर कुटुंबीय दाखविण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये देऊन माणसे भाड्याने घेते. एकदा लग्न पार पडले की, संबंधितांशी संबंध तोडून टाकते. मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून व्यवहार ठरविते. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील मुलाकडून 1 लाख 30 हजार रुपये आणि 70 हजारांचे दागिने अशी डिल (आर्थिक व्यवहार) होती. तसेच तब्बल 10 लाखांपर्यंत ती डील करते अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

Nandurbar APMC Market: मिरचीचा ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

Today's Marathi News Live : पती यशवंत यांनी ४३ वर्षे शिवसेनेला दिली, त्यांची पुण्याई माझ्यापाठी - यामिनी जाधव

Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

SCROLL FOR NEXT