Fake godman Ashok Kharat used fear tactics, fake snakes, and polished seeds to deceive devotees in a shocking Nashik scam. Saam Tv
महाराष्ट्र

भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

Baba Ashok Kharat Scam Nashik Exposed: भोंदूबाबा खरातच्या विकृतीचे पॅटर्न आता महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आलेत... कवडीमोल चिंचोक्यांची लाखोंना विक्री करून भक्तांची खरात फसवणुक करायचा. भक्तांच्या भावनेशी भोंदू अशोक खरात कसा खेळ करायचा ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे आता हळू हळू समोर येऊ लागलेत...विधीच्या नावाखाली महिलांवर अत्य़ाचार करणारा हा भोंदूबाबा... संमोहन आणि अघोरी विधीच्या नावाखाली भक्तांना तो हातोहात फसवतं होता. भक्तांकडून पैसे उकळण्यासाठी खरात नेमके काय फंडे वापरत होता पाहूयात...

खरातकडून भक्तांसमोर नकली साप आणि वाघाची कातडी ठेवून भीतीचं वातावरण निर्माण केलं जायचं. वशीकरणासाठी 20 फुटी नागाचा वापर खरातनं केला... तंत्र- मंत्र करत खरात नागाला बोलवायचा आणि नागाला वश केल्याची बतावणी करायचा.. विशेष म्हणजे खरात या नकली नागाच्या हालचालींवर रिमोट कंट्रोलनं नियंत्रण ठेवायचा.. एवढंच नाही तर बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून ते खडे म्हणून विकायचा. 100 रुपयांचे हे चिंचोके भक्तांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विकायचा. हे खडे आणि रत्न दैवी असल्याचा दावाही खरात भक्तांसमोर करायचा...त्याचबरोबर संतती प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्राण्याची कातडी भक्तांना दिल्याचाही आरोप खरातवर करण्यात आलाय..

नाशिक पोलिसांनी भोंदू खरातला ताब्यात घेऊन 5 दिवस उलटले, सलग केलेल्या तपासात त्याच्या काळ्या कारनाम्याची यादी पाहिली तर गरगरायला होतं. निष्पापांना घाबरवून, राजकीय दबाव वापरून, वासनांध विकृतीचा हा गोरखधंदा कित्येक वर्ष खुल्लेआम सुरु होता. खरात सारख्या भोंदूवर सहज विश्वास ठेवून त्याला भुलणाऱ्या भक्तानी माणसात देव शोधण्याच्या नादात समाजात दानवांना थारा देऊ नये इतकंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खासदार-आमदारांची पळवापळवी! २०२२ पासून १११ नेत्यांनी बदलला पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; आकडेवारी पाहून चक्रावून जाल

Good News: पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! ऑक्टोबरमध्ये मिळणार ५ महिन्यांच्या पेन्शनची थकबाकी; एकाचवेळी किती पैसे मिळणार?

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT