उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राज्यात जातीय द्वेष पसरवला . सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे दसरा मेळावा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होत आहे. या मेळाव्यात त्या बोलत होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
एका बाजुला शेतीमालाला भाव नाही, कापसाचं काय झालं यावर कोणी बोलत नाही, मात्र जातीत भांडणे लावली जात असल्याचं अंधारे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झालीय. ही योजना लॉन्च झाल्यापासून राजकीय नेत्यांसह सामान्य लोकांमध्ये खूप चर्चेत आहे. या योजनेच्या यशानंतर महायुती सरकार जागोजागी याची जाहिरात करत आहे, त्यावरून सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर टीका केलीय. आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? असा सवास करत आपल्याला नात्यांची किंमत कळते असेही अंधारे यावेळी म्हणाल्या. बहिणीचे नाते कळत नाही. हे संस्कार बाळासाहेबांचे असू शकत नाहीत. तसेच हे संस्कार आनंद दिघेंचे आहेत, असेही अंधारे म्हणाल्या. तुमचे हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसचे असू शकतात. न्याय तुम्ही अत्याचार झालेल्या महिलेला देऊ शकत नाही असेही अंधारे म्हणाल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.