राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. यातच राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र भाजपच्या ऑफिशीअल ट्विटर अकाऊंट वरुनही शेअर करण्यात आलाय. ज्यात राहुल गांधींनी विठुरायाचा अपमान केल्याचा दावाही केला गेलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कॅप्शन देण्यात आलंय की, ''निषेध... निषेध... निषेध... विठू माऊलीचा करूनी अपमान.. शहजादा थाटतोय मोहब्बतचं दुकान.''
राहुल गांधी सत्कार करणाऱ्या व्यक्तीच्या हातातली विठूरायची मूर्ती राहुल गांधी नाकारताना दिसतायेत. बाराच वेळा झाला, तरी राहुल गांधी विठुराची मूर्ती स्विकारत नाहीये. पण, व्हिडीओतली ही दृष्य सत्य आहेत का? खरचं राहुल गांधींनी विठुरायाची मूर्ती नाकारली का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी अमच्या असं लक्षात आलं की, हा व्हिडीओ खरा आहे, पण, अपूर्ण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा व्हिडीओ नाशिक येथील आहे. राहुल गांधींची भारत न्याय यात्रा नाशिक येथे आल्यावर त्यांचा हा सत्कार करण्यात आलाय. पण हा व्हिडीओ अपूर्ण आहे. जोवर राहुल गांधी मुर्ती घेत नाही, तोपर्यंतचा भाग भाजपच्या ट्विटर अकांऊंटवरुन शेअर करण्यात आलाय. त्याचा पुढचा भाग नाना पटोले यांनी शेअर केलाय आणि त्यावर कॅप्शन दिलंय की,
धरीला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर ||
हृदय बंदिखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला
शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी
सोहम शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला
त्यांनी लिहिलं आहे की, आम्ही रामाचे पुजारी, हे तर रामाचे व्यापारी... ही संत जनाबाई ह्यांच्या अभंगाची ओळ या भाजपावाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते. पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून-मोडून सादर करायचा, यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचं ४० पैसे आयटी सेल धन्यता मानतं. राहुलजी यांनी विठोबाच्या मूर्तीसोबत जो मानसन्मान त्यांना मिळाला, तो सर्व स्वीकारला. (Latest Marathi News)
त्यांनी ट्विटरवर भाजपला टॅग करत लिहिलं आहे की, ''त्यांचा हा व्हिडिओ @BJP4Maharashtra या ४० पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला. तुम्ही तर राम मंदिर उभारूनसुद्धा देव बाटवला आहे. देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही. पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं, समाजात फुट पाडणं, हे भाजपावाल्यांच्या नसानसात आहे. त्यामुळे आतातरी ही संकुचित वृत्ती सोडा, नाहीतर ज्या दिवशी देव कोपला, तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच समजा.''
दरम्यान, नाना पटोलेंनी महाराष्ट्र भाजपने केलेला दावा पुराव्यानिशी खोडून काढलाय. पण भाजपचा दावाय की, राहुल गांधींनी विठुरायचा अपमान केलाय. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, राहुल गांधींचा सत्कार सुरु असताना, त्यांना फेटा बांधला जात होता. त्यांच्या गळ्यात माळा घातल्या जात होत्या. या सगळ्याच त्यांनी विठुरायाची मूर्ती जरावेळ स्विकारली नाही, पण त्यानंतर त्यांनी मूर्ती स्विकारल्याचं दिसतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.