uddhav thackeray and eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Beed News : दसरा मेळाव्यासाठी वसूल केली जातेय खंडणी? शिंदे गटाचा नवा आरोप

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप

विनोद जिरे

बीड - मुंबईतील ठाकरे-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) राज्यात नवनवीन चर्चा होत असतानाच, आता बीड मधून मात्र या दसरा मेळाव्यावरून, गंभीर आरोप झाल्याने नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील त्यांच्या गटाचे पदाधिकारी हे व्यापारी, अधिकारी व कर्मचार्‍यांना खंडणी मागू लागले आहेत. त्यामुळे व्यापारी व अधिकारी धास्तावले आहेत. असा गंभीर आरोप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी पत्रक काढत व मीडियाशी बोलतांना केला आहे. (Maharashtra Political Crisis)

त्याचबरोबर असले धंदे त्यांनी थांबवावेत. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. असा इशारा देखील सचिन मुळूक यांनी दिला आहे. दरम्यान यामुळं आता ठाकरे - शिंदेंच्या दसरा मेळाव्यावरून नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यामुळं आता राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

दसरा मेळावा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का?

महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा आणि वाटचाल ठरवण्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निश्चितपणे उल्लेख करता येईल. दरवर्षी दसरा मेळाव्यात स्व बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावती भाषण असायचे. बाळासाहेब ठाकरे यांची प्रत्येक सभा ही विरोधकांची पिसं काढणारी आणि आक्रमक असायची. मात्र, बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे स्थान हे काही वेगळेच असायचे.

त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण होता.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT