RCF Company- Raigad Saam TV
महाराष्ट्र

RCF कंपनीच्या बाॅयलरमध्ये स्फोट; एक जण गंभीर, दुसऱ्याला मानसिक धक्का

विजय माळी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर अमाईड केमिकल उडून चेहरा भाजला आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: अलिबाग (Alibaug) तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (RCF) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांट मध्ये स्फोट झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय माळी असे गंभीर जखमी झालेल्या कामगारांचे नाव आहे. माळी याना उपचारासाठी मुंबईत (Mumbai) हलविण्यात आले आहे. तर या अपघाताचा परिणाम होवून अन्य एका कर्मचाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे.

विजय माळी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर अमाईड केमिकल उडून चेहरा भाजला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे सिद्धेश भगत हा कर्मचारी प्रचंड घाबरल्याने त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे. आरसीएफ कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता तांत्रीक अडचणीमुळे त्यांच्याशी बोलता आले नाही. दरम्यान या घटनेमुळे कंपनीच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT