Mathura google
महाराष्ट्र

Mathura Refinery Blast: इंडियन ऑइल रिफायनरीमध्ये स्फोट, १२ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती चिंताजनक

Mathura Refinery Blast: मथुरा रिफायनरीला भीषण आग लागली असून त्यात १२ जण जखमी झाले आहेत. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला आहे. मंगळवारी रात्री मथुरेच्या रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत रिफायनरीमध्ये काम करणारे एक अधिकारी आणि १२ कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीला पाठवण्यात आले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीत गॅस गळतीमुळे ही आग लागली. मथुरा रिफायनरीच्या एबीयू प्लांटमध्ये 40 दिवसांचा शटडाऊन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व काही ठीक असल्याचे निश्चित झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात लिकेज झाल्याचा अंदाज आहे आणि भट्टी फुटल्याने स्फोट झाला, त्यानंतर प्लांटला आग लागली. प्लांट बंद झाल्यानंतर स्टार्टअप उपक्रम सुरु असताना आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मथुरा रिफायनरीच्या जनसंपर्क अधिकारी रेणू पाठक यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नसून आग नियंत्रणात आहे.

रिफायनरीच्या पोलीस हद्दीत ही घटना घडली. रिफायनरीच्या एबीयू प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटनंतर रिफायनरीमध्ये एकच गोंधळ उडाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिथे उपस्थित असलेले लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. अग्निशमन दलाने प्लांटमधील एकूण १० जणांना बाहेर काढले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले.या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Written By: Dhanshri Shintre.

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

SCROLL FOR NEXT