Maval Crime: मावळमध्ये निवडणुकीच्या दरम्यान ३ लाख रुपयांची रोकड जप्त

Cash seized in Maval: मावळमध्ये पुन्हा एकदा मोठी रक्कम सापडली आहे. ऐन निवडणुकीच्या दरम्यान मावळमध्ये दुसऱ्यांदा रोकड जप्त करण्यात आली आहे.
Cash seized in Maval
maval crimeyandex
Published On

मावळ विधानसभेत काल पुन्हा एकदा रोकड सापडली. देहूरोड परिसरात एका फॉर्च्युन गाडीत 3 लाख 20 हजार रुपये आढळून आले. विवेक काळोखे आणि सागर बसे हे दोघे पैसे वाटप करायला आले आहेत, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केल्यावर ही रोख रक्कम आढळली. मात्र गाडीत कोणत्याच पक्षाशी संबंधित चिन्ह अथवा वस्तू आढलेल्या नाहीत. त्यामुळे ही रक्कम कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप ही कोणता खुलासा केलेला नाही.

काळोखे आणि बसे दोघे ही बांधकाम व्यावसायिक आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळं या दोघांना समजपत्र देऊन, ही रक्कम शासनाकडे जमा करून घेण्यात आली आहे. पुढील तपासही सुरु आहे. रविवारी सुद्धा सचिन मुर्हे या बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यलयात 36 लाख 90 हजारांची रोकड आढळली, त्यानंतर घरी जाऊन तपासणी करण्यात आली, तर घरी सुद्धा 15 लाखांची रोकड हाती लागली.

Cash seized in Maval
Gondia Crime: तिरोडा-गोंदिया मार्गावर १५ लाखांची रोख रक्कम जप्त, निवडणूक भरारी पथकाची कारवाई

मुर्हे सुद्धा पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसामोर निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही प्रकरणांनी मावळ विधानसभेचे राजकारण पुन्हा ढवळून निघालेलं आहे. मावळ विधानसभेत पैशांचं वाटप होत असल्याचे आरोप होत आहेत, तक्रारींची शहानिशा केल्यावर दोन ठिकाणी रोकड ही आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. तपासणीत कोणत्याही पक्षाशी संबंधित वस्तू आढळल्या नसल्याने ही रोकड नेमकी कोणाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

Written By: Dhanshri Shintre.

Cash seized in Maval
Visakhapatnam: 'ओके', गेले ३ खोके! नवरा-बायकोचं भांडण, रेल्वेला ३ कोटींचा भुर्दंड, कसं काय?

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com