Pawar Hospital Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

धक्कादायक! दीड महिन्यांच्या बाळाला पाजला मुदत संपलेला डोस; खाजगी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल

Pawar Hospital Beed News : यानंतर बाळाच्या आजोबांनी रुग्णालयाविरोधात थेट आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

विनोद जिरे

Beed Pawar Hospital Crime: बीडमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुदत संपलेला डोस दीड वर्षाच्या बाळाला (Baby) पाजण्यात आल्याची संतापजनक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. बीडच्या (Beed) माजलगाव शहरात असणाऱ्या पवार हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर बाळाच्या आजोबांनी रुग्णालयाविरोधात थेट आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यामुळे बाळाच्या नातेवाईकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Beed Latest News)

माजलगावमध्ये राहणाऱ्या तक्रारदार अशोक धारक यांच्या मुलीची प्रस्तुती दीड महिन्यांपूर्वी झाली असून त्यांच्या मुलीला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. या बाळाला घेऊन डोस देण्यासाठी तक्रारदार आजोबा शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये गेले होते. यावेळी या बाळाला येथील नर्सकडून रोटाव्हायरस हा डोस पाजण्यात आला, तर न्युमोकोकल हा डोस कंपाऊंडरने मांडीला दिला.

मात्र हा डोस मेडिकलमधून न मागवता हॉस्पिटलमधील एका रूममधून आणला. त्यामुळे तक्रारदार आजोबाला याविषयी संशय वाटल्याने त्यांनी डोस दिलेल्या बॉक्सचा फोटो काढला आणि घरी आल्यावर आपल्या मुलीला दाखवला. यानंतर बॉक्स पाहून बाळाच्या आईचे डोळे चक्रावून गेले आणि चक्क मुदत संपून गेलेला डोस आपल्या मुलीला दिल्याचं समोर आलं.

दरम्यान याप्रकरणी आजोबांनी या प्रकारची तक्रार आरोग्य विभागाकडे दिली आहे. तर या डोसमुळे काही परिणाम होणार नाही. बाळाला आम्ही पुन्हा डोस देणार आहोत. असे स्पष्टीकरण डॉक्टर पवार यांनी दिलं आहे. यामुळे आता आरोग्य विभाग काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याचा हल्ला; वृद्ध दांपत्याचा मृत्यू, शाहूवाडी तालुक्यातील घटनेने खळबळ

शनिवारवाड्यात आंदोलन! अनधिकृत पीर काढा, सकल हिंदू समाजाची मागणी|VIDEO

Sadhvi Pragya Controversy Statement: पळून जाणाऱ्या मुलींच्या तगड्या तोडा; साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

Crime: बापाचं हैवानी कृत्य! ९ वर्षांच्या मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवत लैंगिक अत्याचार, नवी मुंबई हादरली

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्डीले कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

SCROLL FOR NEXT