Panchganga River संभाजी थोरात
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या पंचगंगा नदी पात्रात पुन्हा मृत माशांचा खच; प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आठवड्याभरापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणाबाबत घेतली बैठक होती.

संभाजी थोरात

कोल्हापूर - पंचगंगा नदी पात्रात पुन्हा मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. वळीवडे मधील सुर्वे बंधारा जवळ प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. आठवड्याभरापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोल्हापुरात (Kolhapur) पंचगंगा प्रदूषणाबाबत घेतली बैठक होती. असे असले तरी पुन्हा एकदा पंचगंगा नदी (Panchganga River) प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इतक्या माशांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

हे देखील पहा -

पंचंगगा नदीत अनेक केमिकल मिश्रित गोष्टी सोडल्या जात असल्याने नदीच्या पात्रातील पाणी नेहमी प्रदुषित असल्याचे पाहायला मिळते. पंरतु तिथं सध्या नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. या माशांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आठदिवस झाल्यानंतर अशी घटना घडल्याने कोल्हापूरात बैठक फक्त नावालाच घेतली असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. तसेच पंचगंगा नदीचं पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतं असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच आता इतक्या मोठ्या प्रमाणात मृत झालेल्या माशांना कसं नष्ठ करायचं असा प्रश्न पर्यावरण खात्याला पडला असेल. माशांची तपासणी केल्यानंतर नेमका माशांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी पर्यावरण विभागापुढे मोठं आवाहन असणार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: ४ राशींच्या व्यक्तींना गुंतवणूक ठरेल लाभदायक, पैशाची तंगी होईल दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Gajkesari Rajyog: डिसेंबर महिन्यात बनणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींना अचानक मिळणार बक्कळ पैसा

BSNL चा धमाका! अनलिमिटेड कॉलिंग अन् १०० जीबी डेटा; विद्यार्थांसाठी आणला नवा प्लॅन

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Income Tax Refund: करदात्यांसाठी बातमी, कर परतावा कधी मिळणार, आली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT