arrest, video viral, yavatmal
arrest, video viral, yavatmal Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad News: ढाब्यावरील ओली पार्टी पोहोचवेल तुरुंगात, औरंगाबाद पॅटर्नची राज्यभर चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, साम टिव्ही ब्युरो

>> माधव सावरगावे

औरंगाबाद : ढाब्यावर जाऊन पार्टी करण्याचा विचार करत असाल तर सावधान. कारण ढाब्यावर दारू पिणाऱ्यांच्या हातात बेड्या आणि दंड बसतोय. औरंगाबाद पॅटर्नची सध्या राज्यभर चर्चा आहे. ढाब्यावर दारू आणि चकना घेऊन बसलेले आढळल्यास ढाबा चालकांसह मद्यपींना दंड भरावा लागेल. सध्या औरंगाबादमध्ये ढाब्यावर बसून आंनद लुटणाऱ्यांना जबर झटका बसतोय.

औरंगाबाद जिल्ह्यात मागील पाच महिन्यांपासून ढाब्यांवर सर्रासपणे दारू विक्री करण्यासह मद्य पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबादच्या उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीसह पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ढाब्यांच्या विरोधात मोहिमच उघडली आहे. (Aurangabad News)

औरंगाबादेतील आतापर्यंतची कारवाई

या कारवाईचा औरंगाबाद पॅटर्न झालाय. आता त्याची राज्यभरात अंमलबजावणी होत आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी कारवाईत 157 ढाब्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व मद्यसेवन करणाऱ्या 638 जणांना अटक केली. त्यातील 121 जणांना न्यायालयाने दंड ठोठावला. 510 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत 3 कोटी 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Latest News)

ढाब्यांवर परवानगी नसताना मद्यविक्री आणि ग्राहक दारू पिऊन गोंधळ घालण्याच्या संख्या वाढल्या आहेत. त्यासोबतच गुन्हेगारीही अधिक वाढत चालली आहे. या कारवाईमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्ह्यांवर आळा बसलाय. त्यामुळे ढाब्यावर पिताना दिसले की थेट कारवाई सुरू आहे.

विनापरवाना दारू विक्री, विनापरवाना दारू पिणे त्यामुळे गोंधळासोबत गंभीर गुन्हेगारीच्या घटना आता वाढत असल्याने कारवाई करणे, गरजेचे होते. आता सुरुवात औरंगाबादपासून झाली, हाच औरंगाबादचा पॅटर्न राज्यभर राबवला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात; अहमदनगरमध्ये आज ३ सभा घेणार

KL Rahul Statement: 'इथेच आमची चूक झाली...' सामना गमावल्यानंतर KL Rahul ने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Leg Pain: रात्री झोपताना पाय दुखतात? 'या' उपायांनी होईल फायदा

Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

SCROLL FOR NEXT