#परीक्षांचाधंदाथांबवा : ऐनवेळी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांनी रात्र काढली रेल्वेस्टेशनवर अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा : ऐनवेळी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांनी रात्र काढली रेल्वेस्टेशनवर

ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला

अॅड. जयेश गावंडे

अकोला : ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवरच रात्र काढावी लागली आहे.

पहा व्हिडिओ-

आज परीक्षा असल्याने अनेकांनी अकोला गाठले होते. परीक्षा रद्द झाल्याचे समजताच रात्री उशिरा घरी परतण्यास मार्ग नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी रात्र रेल्वेस्थानकावरच काढल्याचे शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास अनेक विद्यार्थी फिरताना दिसून आले आहेत. आरोग्य विभागाची परीक्षेसाठी अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट आदी परीक्षा केंद्र असल्याने राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अकोला गाठले होते.

तब्बल 300 ते 400 कि.मी.चा प्रवास करून, अकोला या ठिकाणी पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुलींचाही सहभाग होता. अनेकांना वेळेवर लॉज, रूम उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानकावर रात्र काढावी लागली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टात याचिका; वगळलेली मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मोठी मागणी

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Dategad Fort: दातेगडच्या कातळात कोरलेली तलवारीच्या आकाराची विहीर; या अनोख्या रचनेमागचं रहस्य नेमकं काय?

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT