Pune Rave Party saam tv
महाराष्ट्र

खडसेंच्या जावयाला ठरवून ट्रॅपमध्ये अडकवलंय, कॉल करून बोलावलं अन्.. हॅकरचा मोठा दावा

Big Twist in Pune Rave Party Case: रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणावर एथिकल हॅकरनं मोठा दावा केला आहे.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई, एकनाथ खडसेंचे जावई खेवलकर ताब्यात

  • खेवलकर यांच्यावर ड्रग्स पार्टीत सहभागी असल्याचा आरोप

  • वकील आणि एथिकल हॅकरचा दावा – ट्रॅपमध्ये अडकवले

  • कॉल रेकॉर्ड आणि ब्लड टेस्टमधून सत्य बाहेर येण्याची शक्यता

पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. तसेच एकूण ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात २ तरूणींचा समावेश होता. परंतु, या प्रकरणाबाबत खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे आणि एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयसिंह ठोंबरे म्हणाले, फ्लॅटमध्ये एकत्र आल्यावर त्याला रेव्ह पार्टी म्हणता येणार नाही. खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थांचे सेवन केलेलं नाही. हे बल्ड टेस्ट केल्यानंतर स्पष्ट होईल. त्यांच्यावर याआधीही २ वेळा पूर्वनियोजित पद्धतीनं ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे, असा दावा वकिलांनी केला आहे.

तर, मनीष भंगाळे यांनी रेव्ह पार्टी छापाप्रकरणात गंभीर आरोप केला आहे. 'खेवलकर यांचा रेव्ह पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यांना त्या ठिकाणी कॉल करून बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर छापेमारी झाली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात ज्या काही तांत्रिक बाबी समोर आल्या आहेत, जी माहिती गोळी केली आहे. त्यानुसार त्यांना स्पष्टपणे ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचं समजतंय. या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही', असा दावा एथिकल हॅकर यांनी केला आहे.

तसेच, पुणे पोलिसांनी चौकशी केल्यास आणि खेवलकरांचे कॉल रेकॉर्डस तपासून पाहिल्यास त्यांच्याविरोधात रचण्यात आलेला कट स्पष्ट होईल, असंही मनीष भंगाळे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

Maharashtra Flood: दर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या; सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार?

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

Sudha Murty: खासदार सुधा मूर्ती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर; अश्लील व्हिडिओच्या नावे दिली धमकी

SCROLL FOR NEXT