Ex-Deputy Sarpanch Govind Barge Saam
महाराष्ट्र

माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

Ex-Deputy Sarpanch Govind Barge: गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी कुटुंबियांना वेगळाच संशय. या प्रकरणामागे घातपात झाला असावा अंदाज. नातेवाईकांनी कसून चौकशीची मागणी केली आहे.

Bhagyashree Kamble

  • बीडच्या गेवराईतील लुखामसला गावात माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण उघडकीस.

  • प्रकरणात पूजा गायकवाड हिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

  • नातेवाईकांचा आरोप – गोविंद बर्गेंना पैशांची मागणी व ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केले.

  • कसून चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नातेवाईकांची.

बीडच्या गेवराईतील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र, या प्रकरणात विविध ट्विस्ट समोर येत आहेत. या प्रकरणी बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाड हिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आता गोविंद यांच्या नातेवाईकाने धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

गोविंद यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले की, 'आमच्या दाजींचा घातपात झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे या प्रकरणात कसून चौकशी झाली पाहिजे. आमच्या दाजींकडे रिव्हॉल्वर नव्हतीच. त्यादिवशी रिव्हॉल्वर कशी काय आली?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'गोविंदला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय. आमच्या दाजींना बऱ्याच दिवसापासून त्रास दिला जात होता. गेल्या पंधरा दिवसापासून ते अतितणावात होते. त्यांना वारंवार पैशांची मागणी केली जात होती. ब्लॅकमेल केलं जात होतं', अशी माहिती गोविंदच्या नातेवाईकांनी दिली.

दरम्यान, या घटनेची कसून चौकशी करावी, तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गोविंद यांच्या मेहुण्याने केली. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, तपासातून अनेक धागेदोरे उघडकीस येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

रुग्णाला ४ वेळा उपाशी ठेवून ऑपरेशन रद्द; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Dombivali: ८ वर्षांचे प्रेम, प्रेमी युगुलांनी कोर्टात लग्न केलं, मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांसमोर लग्न लावतो म्हणत नेलं अन्...

SCROLL FOR NEXT