राजेश काटकर
परभणी : परभणीत काही ठिकाणी आजही ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. अशा परिस्थितीत जर गावात कुणाचा मृत्यू झाला तर, गावकऱ्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या नागठाना या गावात अशीच एक घटना घडली असून गावातील 36 वर्षीय गृहणी वैजयंता होरे यांना घर काम करत असताना विजेचा शॉक लागला. मृत्यू झाल्यावर पुन्हा गावाकडे जाण्यासाठी तब्बल ३८ किमीचा रुळावरून प्रवास करावा लागला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना राबवली जात आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. त्यात पावसाळ्याच्या दिवसात तर त्यांना गुडघाभर चिखलातून वाट तुडवीत मार्ग काढावा लागत आहे.
हे देखील पहा-
महिलेला दवाखान्यात घेऊन जायचे होते पण, जिल्ह्यात सतत पाऊस होत असल्याने या गावाचा संपर्क ईतर गावांशी तुटला, त्यामुळे चिखल तुडवीत दोन गाड्या बदलत, गावकऱ्यांनी कसेबसे उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून महिलेचे प्रेत अंत्यविधीसाठी पुन्हा गावाकडे घेऊन जाण्याची वेळ गावकऱ्यांनवर आली.
मात्र अशा परिस्थितीत मृतदेह घेऊन जाणार कसे ? शिवाय मृतदेहाला जाळण्यासाठी लागणारे लाकुड कस घेऊन जायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. गावाला जाणारा एकमेव रस्ता पुलावर पाणी असल्याने बंद झाला होता, त्यामुळे दैठणा मार्गे मृतदेह आणण्यात आले ,
त्यात अॅब्युलन्स आणि रेल्वे रुळाने पायी असा तब्बल 38 किलोमीटर अंतर पार करुन मृत महिलेला घेवुन गाव गाठाव लागल. त्यामुळे मेल्यानंतर ही या गाववासीयांची मरण यातना संपत नाही आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.