समता परिषदेच्या वतीने मराठवाडा स्तरीय ओबीसी जनजागृती शिबिराचे आयोजन विनोद जिरे
महाराष्ट्र

समता परिषदेच्या वतीने मराठवाडा स्तरीय ओबीसी जनजागृती शिबिराचे आयोजन

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरकेंसह उत्तमराव कांबळे शिबीरात उपस्थितीत होणार आहेत. आठ जिल्ह्यातून येणार ओबीसी बांधव येणार आहेत.

विनोद जिरे

बीड: स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यानंतर, ओबीसी समाज हा राज्यभर आक्रमक झाला आहे. त्यामुळे हे आरक्षण पूर्ववत करावं, त्याचबरोबर ओबीसी समाजाची जनगणना तात्काळ करावी. या मागणीसाठी समता परिषदेने बीडमध्ये रस्ता रोको देखील केला होता.

तर याच ओबीसींच्या प्रश्नांवर, मराठवाड्यातील ओबीसी संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचे, उद्या बीडमध्ये समता परिषदेच्या वतीने, मराठवाडा स्तरीय ओबीसी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. या शिबिराला ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरकेंसह उत्तमराव कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिरासाठी आठ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारकडून ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय आणि ओबीसी समाजाचे प्रश्न, समस्या यापासून सर्वसामान्य ओबीसी अनभिन्न आहे. त्यांना त्यांच्याच प्रश्नांची जाणीव करून देण्यासाठी समता परिषदेचे अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून भव्य विभागस्तरीय प्रबोधन शिबिर बीड येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: हद्दच झाली! बाजारात अश्लील डान्स नंतर नागरिकांनी धु धु धुतले; तरुणाच्या कारनाम्याचा VIDEO व्हायरल

Mumbai Crime : दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास मुलाने दिला नकार, बापाने मुलाचा काटा काढला

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nikki Tamboli: निक्की रिलेशनशीपमध्ये? कोण आहे बॉयफ्रेंड?

Aadhaar Card Update: आता फुकटात करा आधार कार्ड अपडेट ; फक्त या स्टेप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT