home  saam tv
महाराष्ट्र

घरमालकांसाठी खूशखबर, सगळ्या घरांना एकसारखाच मेंन्टेनन्स? रिडेव्हलपमेंटसाठी किती कर्ज मिळणार?

New Housing Guidelines: जितकं मोठं घर तितकाचं सोसायटीला द्यावा लागणारा मेन्टेनन्स ही जास्त असतो. मात्र आता घरमालकांना एकसारखा मेंन्टेनन्स भरावा लागणार आहे. ते कसं पाहूयात या विशेष रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठं घर खरेदी करताना अनेकवेळा घराच्या देखभालीपोटी भराव्या लागणाऱ्या शुल्काचाही विचार करावा लागतो. मात्र आता तुमचं घर कितीही स्क्वेअर फूटचं असलं तरी तुम्हाला एकसारखा मेंन्टेनन्स सोसायटीला द्यावा लागणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नव्या नियमानुसार विविध क्षेत्रफळांच्या फ्लॅटसाठी एकसारख्या देखभाल शुल्काची तरतूद प्रस्तावित आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या हाऊसिंग फेडरेशनची एक बैठक सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडली. त्यावेळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? पाहूयात...

गृहनिर्माण संस्थेसंदर्भात नवे नियम?

गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळ्या घरांसाठी समान देखभाल शुल्क आकारणी

ऑनलाईन बैठकांना कायदेशीर दर्जा मिळणार

सोसायटीचं नोंदणी शुल्क 2500 वरून 5000 रुपये होणार

खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी वारसदार नियम सोपे करणार

पुनर्विकासासाठी सोसायटीच्या जमिनीच्या दहापट कर्ज मिळणार

नव्या नियमासंदर्भात हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत 15 मेपर्यंत होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील अंतिम मसुदा राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नव्या नियमांमुळे रिडेव्हलपमेंट, कर्ज मर्यादा, मेंटेनन्स दर यासंदर्भातील नियम आणि अटी सोप्या होणार का? याची उत्सुकता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishnu Missile: चीन-पाकिस्तानला 'विष्णू'ची धडकी, भारताचं रक्षण करण्यासाठी सज्ज; आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update : परतवाडा-चिखलदरा मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी

Thane Crime News : भिवंडीतील १६ वर्षीय तरुणीचा रौद्र अवतार; अपहरणाचा डाव उधळला, रिक्षाचालकावर करकटकने हल्ला

Crime News : हॉटेलमध्ये जाऊन सोबत पिले दारू; बाहेर निघताना झाला वाद, नशेतच चाकूने हल्ला करत केली हत्या

GK: सीमेवर वसलेलं 'हे' आहे भारतातील अंतिम रेल्वे स्थानक

SCROLL FOR NEXT