मनसेची राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत एन्ट्री संजय डाफ
महाराष्ट्र

मनसेची राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत एन्ट्री

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपमध्ये वैर वाढत असतानाच आता मनसे भाजपशी जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना Shivsena आणि भाजपमध्ये BJP वैर वाढत असतानाच आता मनसे MNS भाजपशी जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यामुळेच मनसे परप्रांतीयांचा मुद्द्याला बगल देत राज ठाकरेंच्या Raj Thackeray आदेशाने मनसे नेत्याची राष्ट्रीय स्तरावरील ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री झाली आहे.

हे देखील पहा -

विदर्भातील मनसे नेते राजू उंबरकर यांची ‘हिंद मजदूर सभे’चे महाराष्ट्रात महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेच्या हाती राष्ट्रीय स्तरावरील मजदूर संघटनेची धुरा आली आहे.

‘हिंद मजदूर सभा’ देशातील WCL कामगारांची मोठी संघटना आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करत मनसेने ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री केली आहे. ‘आता मनसे स्टाईलने हजारो WCL कामगारांसाठी काम करणार असून, WCL ने जमिनी घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या नाही, असे म्हणत गरज भासल्यास प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि कामगारांसाठी मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा हिंद मजदूर सभेचे नवनियुक्त महाराष्ट्र महासचिव राजू उंबरकर यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

Microwave: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने होतात 'हे' परिणाम

Shocking : धक्कादायक! दारुच्या नशेत ५ जणांचा घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

SCROLL FOR NEXT