पालघर: प्रेमी जोडप्याची आत्महत्या Saam TV
महाराष्ट्र

दुर्दैवी: प्रेम मिळालं! पण, दोघांनीही गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघरमधील घटनेनं हळहळ

पालघर: मागील दोन आठवड्यापासून सुदीपने कंपनीतही अचानक जाणे बंद केले होते. काही दिवसांपासून आर्थिक चणचनीमूळे त्याचं मानसिक खच्चीकरण झालं होतं.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर: डहाणू (Dahanu) तालुक्यातील वरखंडा (Varkhanda) गावाच्या हद्दीतील कुर्झे धरणालगत (Kurze Dam) एका बोरीच्या झाडाला गळफास घेऊन युवक-युवतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुस्मिता प्रकाश भीमरा (वय 21) रा. उपलाट कलंबटपाडा आणि सुदीप धाकू उंबरसाडा (वय 23) रा. वरवडा डोंगरीपाडा अशी आत्महत्या (suicide) करणाऱ्या दोघांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी (Talasari Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करत शवविच्छेदनाकरीता तलासरी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. (Unfortunate: Got love! But, both of them ended their lives by hanging; The incident in Palghar caused a stir)

हे देखील पहा -

सुस्मिता व सुदीप यांचे प्रेम होते. काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत असून सुदीप याचा सलूनचा व्यवसाय होता. परंतु सलून चालत नसल्याने एका खाजगी कंपनीमध्ये कामगार म्हणून कामाला जात होता. मात्र मागील दोन आठवड्यापासून सुदीपने कंपनीतही अचानक जाणे बंद केले होते. काही दिवसांपासून आर्थिक चणचनीमूळे (Financial Issues) त्याचं मानसिक खच्चीकरण झालं होतं, यामुळं आर्थिक चणचनीला कंटाळूनच जीवन संपवल्याच सांगण्यात येत असून तलासरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT