जालना : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांसोबत बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेनेला एकावर एक हादरे दिले असतानाच दुसरीकडे ईडीनेही दणका दिला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर (Arjun Khotkar) ईडीच्या रडारवर आले आहेत. खोतकर यांनी रामनगर सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला. त्यानंतर ई़डीकडून साखर कारखाना जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडूनकडून जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील जालना सहकारी साखर कारखान्याच्या इमारतीसह यंत्रसामग्री व जमीन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खोतकर यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याचा बेकायदा लिलाव केल्याप्रकरणी ई़डीकडून कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने फसवणूक करून खरेदी केला. यात त्यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला,एवढेच नाही तर राज्य सरकारच्या मालकीचीशेतकऱ्यांनी कारखान्यासाठी दिलेली तब्बल एक हजार कोटी किमतीची शंभर एकर जमीन हडपण्याचाही खोतकर यांनी प्रयत्न केला, असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
जालन्यातील रामनगरमध्ये असलेल्या या कारखान्याकडे 217 एकर जमीन आहे.हा कारखाना विकू नये अशी मागणी सभासदासह या परीसरातील शेतकऱ्यांनी केली होती.पण राज्य सहकारी बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी थेट कारखानाच विकला होता. त्यामुळे कारखान्याच्या परिसरातील शेतकरी नाराज झाले होते.परिसरातील ऊस शेतीही नाहीसी झाला होता. आजही याच कारखान्यातील अनेक कामगारांचे पगार थकलेले आहेत.त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी सभासद आणि शेतकऱ्यांनी केल्या जात असताना राज्य सहकारी बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी थेट कारखानाच विकला.
जालना जिल्ह्याचे माजी खासदार बाळासाहेब पवारांनी या कारखान्याची मुहूर्तवेढ रवलेला हा कारखाना 1987 साली सुरु झाला.त्यानंतर 10 वर्ष कारखाना चांगला चालला.पण नंतर कारखान्याने घेतलेले 11 कोटी रूपयांवरील व्याज 20 कोटी रुपये होऊन एकूण थकबाकी 31 कोटी झाली आणि अखेरीस हा कारखाना कर्जाच्या बोजापायी राज्य सहकारी बँकेने विक्री केला.तेव्हापासून आजपर्यंत हा कारखाना बंदच आहे.कारखान्याची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी-विक्री प्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्यावर निशाणा साधलात या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे रामनगर साखर कारखाना हा पुन्हा चर्चेला आला.
त्यानंतर याबाबत कारखान्याच्या काही कामगारांनी आणि सभासदांनी हा कारखाना गैर मार्गाने विक्री झाल्याच्या तक्रारी ईडीकडे केल्या. त्या नंतर २६ नोव्हेंबर २०२१ ला ईडीच्या पथकांनी जालना शहरातील अर्जुन खोतकर आणि संजय खोतकर यांची मालकी झलेल्या अर्जुन खोतकर शुगर मिलच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. दरम्यान ईडीकडून अर्जुन खोतकर यांची तब्बल 12 तास चौकशी,चौकशी दरम्यान अनेक कागदपत्रांची चौकशी,खोतकर बिजनेस सेंटर सह,रामनगर साखर कारखान्याच्या व्यवहाराची ही चौकशी करण्यात आली होती.
त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खबळ उडाली होती.या चौकशीनंतर आज ईडीकडून अर्जुन खोतकर यांच्या मालकीचा असलेल्या अर्जुन खोतकर शुगर मिल्स जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदा लिलाव केल्याप्रकरणी ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. जालना तालुक्यातील हडप सावरगाव येथील जालना सहकारी साखर कारखान्याच्या इमारती सह यंत्रसामग्री व जमीन जप्तीची कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ झालीय.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.