Temple Dress Code
Temple Dress Code Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Temple Dress Code: भक्तांप्रमाणे मंदिरातील पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Shivani Tichkule

Nagpur News Today: मंदिर महासंघाच्या आवाहनावर नागपुरातील पाच मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरातील पवित्र कायम राहावं यासाठी भक्तांनी मंदिरात प्रवेश करताना चित्रविचित्र किंवा अश्लील कपडे घालू नये असे मंदिर महासंघाचं म्हणणं आहे.  (Latest Marathi News)

मात्र, भक्तांप्रमाणेच पुजाऱ्यांनाही ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी केली आहे. भाविकांना वस्त्र संहिता लागू केली, यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, अनेक मंदिरात पुजारी खाली धोतर आणि वर केवळ दुपट्टा किंवा काहीही घातलेले नसते.

त्यामुळं भाविकांनी जर नीट कपडे घालावे असे वाटत असेल तर तोच नियम पुजाऱ्यांनाही लागू होतो. शेगावच्या संत गजानन मंदिरात (Temple) पुजारी आणि सेवक पैजामा, शर्ट आणि डोक्यावर टोपी या एकाच पोशाखात असतात. त्याच धर्तीवर इतर मंदिरात ही तशा किंवा इतर पारंपरिक पोशाखात पुजारी असावेत, अशी मागणी सावरबांधे यांनी केली आहे. (Nagpur News)

'या' मंदिरात ड्रेसकोड लागू

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपुरातील पाच मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी ही वस्त्र संहिता लागू केल्याचं महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच पहिल्या महिन्यात राज्यभरातील ३०० पेक्षा जास्त मंदिरांमध्ये हा नियम लागू करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंदिर महासंघाने दिली.

नागपूरातील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांचा समावेश आहे. तोकडे कपडे घालून मंदिरात आल्यास त्यांना ओढणी, पंचा दिला जाईल, त्यानंतर त्यांना प्रवेश दिला जाईल. यासंदर्भात प्रचार प्रसारही केला जाणार असल्याचं महासंघाच्या वतीनं सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावर बस आणि कारचा भीषण अपघात, तिनजण जागीच ठार

Hiccups Treatment : अगं बाई! उचकी लागल्यावर काय कराल?

Zinc Deficiency: शरीरात झिंकची कमतरता आहे? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Chhagan Bhujbal News : होर्डिंग दुर्घटनेशी त्यांचा संबंध काय? भाजपने ठाकरेंचा फोटो ट्विट केल्यानंतर भुजबळांचा सवाल

Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; दुसरबीड ग्रामपंचायतीवर काढला हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT