ओपन स्पेसवर कॉन्व्हेंट स्कूलचे अतिक्रमण; स्थानिकांची महापालिकेकडे तक्रार
ओपन स्पेसवर कॉन्व्हेंट स्कूलचे अतिक्रमण; स्थानिकांची महापालिकेकडे तक्रार अरुण जोशी
महाराष्ट्र

ओपन स्पेसवर कॉन्व्हेंट स्कूलचे अतिक्रमण; स्थानिकांची महापालिकेकडे तक्रार

अरुण जोशी

बडनेरा: बडनेरा badnera नवी वस्ती परिसरातील व्यंकटेश बालाजी नगरातील vyankatesh balaji nagar महापालिकेच्या ताब्यातील एका ओपन स्पेसवर open space परिसरातीलच एका कॉन्व्हेंट स्कूलने convent school अतिक्रमण Encroachment करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या सहआयुक्तांकडे Municipal Joint Commissioner लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांनी मेहनत घेऊन सुशोभीकरण Beautification केलेल्या या ओपन स्पेसला खेळाचे मैदान म्हणून वापरून शाळेच्या संचालकांनी त्याची एैशीतैशी चालविल्याचा प्रकार स्थानिकांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिला असून संबंधितांवर या प्रकरणी कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

हे देखील पहा -

बडनेरा परिसरात नव्याने वस्ती झालेल्या व्यंकटेश बालाजी नगरात महापालिकेच्या मालकीची एक ओपन स्पेस असून या ओपन स्पेसचा वापर परिसरातील नागरिकांना बगीचा म्हणून सर्वांना करता यावा यासाठी विविध प्रकारची झाडे लावून त्याचे सुशोभीकरण सामुहिक खर्चातून केले आहे. त्याच शेजारीच असलेल्या इग्नाईट माईंड्स या कॉन्व्हेंट स्कूलने Ignite Minds Convent School विद्यार्थ्यांच्या खेळाचे मैदान म्हणून जबरदस्तीने वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत शाळांना उघडण्याची परवानगी नसताना देखील या शाळेच्या संचालकांनी सदर ओपन स्पेसला नागरिकांनी लावलेले कुलुप जबरदस्तीने तोडून त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या ओपन स्पेसवर नागरिकांनी केलेले सुशोभीकरण यामुळे पूर्णपणे खराब झाले असल्याची तक्रार स्थानिक रहिवाश्यांनी महापालिकेच्या सहआयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे. नागरिकांनी सदर शाळेच्या संचालकांना याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनाच धमकावल्या जात असल्याचा भयानक प्रकार नागरिकांनी लेखी निवेदनातून मांडला आहे.

ओपन स्पेसचे कुलूप तोडून, नागरिकांना धमक्या देऊन ओपन स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्या शाळा संचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सोबतच या शाळेकडे स्वत:चे मैदान नसताना या शाळेला परवानगी कशी देण्यात आली? असा सवाल देखील स्थानिकांनी विचारण्यास आता सुरूवात केली आहे. शाळा संचालकांविरूद्ध स्थानिक अशी लढाई सध्या सुरू झाली असून त्यात प्रशासन नेमके काय करणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

उलटा चोर कोतवाल को डाटे

सदर प्रकरणी शाळेच्या संचालकांकडून पोलिस प्रशासनात अधिकारी असलेल्या एका मित्राच्या सहाय्याने स्थानिक नागरिकांनाच पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी चालवली आहे. पोलिसांना या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आल्याची माहिती असून पोलिसांनी या प्रकरणात काही नागरिकांना बडनेरा पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केल्याची माहिती आहे. शाळा संचालकांकडून नागरिकांवर दबाव आणून सदर ओपन स्पेसचा वापर शाळेचे मैदान म्हणून वापरण्याचा प्रकार सुरू केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

Maharashtra Rain Update: विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Today's Marathi News Live : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

SCROLL FOR NEXT