Nagpur Bus संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur Bus Strike: नागपूरमध्ये आपली बससेवेतील कर्मचारी संपावर

नागपूर शहर महापालिकेत 'आपली बस' सेवेत असलेले सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून अचानकच संपावर गेले

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर: नागपूर शहर महापालिकेत 'आपली बस' (Nagpur Aapli Bus) सेवेत असलेले सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून अचानकच संपावर गेले आहेत. वाहकांचा पगार झाला नसल्यामुळे सर्व वाहक संपावर गेले आहे. यामुळे महापालिकेच्या शहर परिवहन सेवेत असलेली आपली बसची वाहतूक खोळंबली आहे. यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे. (Employees our bus service on strike Nagpur)

नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेत असलेले सर्व कंडक्टर (वाहक) आज सकाळपासून संपावर गेल्याने शहरात बस सेवेचा चांगलंच खोळंबा झाला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच नोकरदार वर्गाला अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयात परीक्षा सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. युनिटी security फोर्स या खाजगी कंपनीने आपली बसकरिता वाहक नेमणुक करण्याची आणि त्यांच्या पगाराची जबाबदारी होती.

हे देखील पहा-

दरम्यान महापालिका आणि आपली बस सेवा चालवणाऱ्या खाजगी कंपन्या आपली बस सेवेमधून मोठी कमाई करत असतात. मात्र, वाहकांचा पगार वेळेवर का देत नाही असा अनेक नागपुरकर असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान बससेवा पूर्ववत करण्याकरिता महापालिकेच्या परिवहन समितीने ही प्रयत्न सुरू केले आहे. लवकरच यावे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजत आहे. आपली बस चे मुख्य डेपो असलेल्या मोरभवनमध्ये सर्व वाहक एकत्र आले आहेत, ते कामावर जायला तयार नाहीत. यामुळे शहर परिवहन सेवेतील बहुतांश बस उभ्याच आहेत.

सर्वांना मोठी अडचण

नागपूर पालिका बससेवेत कर्मचाऱ्यांच्या (वाहकांच्या) संपाने नागपूरकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. महापालिका बस सेवेच्या चालक वाहकांच्या संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांचे आज सकाळी मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. कोरोनानंतर राज्यात परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय देखील सुरु झाली आहेत. या बस सेवा बंद असल्यामुळे नागपूरकरांना मोठया प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT