पंकजा मुंडेंचं भावनिक पत्र; कोणता संकल्प करणार याकडं राज्याचं लक्ष Saam TV
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं भावनिक पत्र; कोणता संकल्प करणार याकडं राज्याचं लक्ष

विनोद जिरे

बीड : भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून एक भाविनक पत्र लिहिलं आहे. 12 डिसेंबर रोजी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हे भावनिक पत्र ((Pankaja Munde) Letter) लिहिलं आहे. या दिवशी त्या काहीतरी विशेष संकल्प करणार असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शिवाय, आपल्या समर्थकांना देखील त्या हा संकल्प करायला सांगणार का ? असं भावनिक पत्र त्यांनी लिहीलं आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही.“प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले.

अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.” “कोणत्याही नात्याविना इतकं प्रेक कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे, गुरू, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं!”

तर, या पत्राच्या शेवटी पंकजा मुंडे, “या 12 डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते ऐकाल का ? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य ? ” असं म्हणाल्या आहेत. त्यामुळं पंकजा मुंडे नेमका काय संकल्प करणार ? त्यांनी कोणता संकल्प करण्यास समर्थकांना आवाहन केलं आहे ? हे अस्पष्ट असल्याने समर्थकांसह राजकीय वर्तुळात, कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 13 डिसेंबर रोजी हे स्पष्ट होणार असून नेमकं पंकजा मुंडे काय संकल्प करणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

SCROLL FOR NEXT