Sunetra Pawar Receives EC Notice: saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवार यांना पत्र; राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार?

Sunetra Pawar Receives EC Notice: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या घटनेतील सुधारणांबाबत स्पष्टीकरण आणि पूरक कागदपत्रे मागवली आहेत. या पत्रात नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचे पत्र का?

  • राष्ट्रवादीच्या घटना दुरुस्तीवर आयोगाचे प्रश्न

  • राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर वाद

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचा दावा सच्चिदानंद यांनी केला होता. यानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना एक पत्र पाठवलं आहे. यात पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यात आलेले नाहीत असे आयोगाने या पत्रात म्हटलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. भारत निवडणूक आयोगाच्या मते, २६ फेब्रुवारी,२०२६ रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम १८(१) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. पक्षाने कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्येही बदल केले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाकडून या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असं सांगण्यात आलंय.

याआधी सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला १० मार्च २०२६ आणि ७ एप्रिल २०२६ रोजी जी पत्र पाठवण्यात आली होती. त्या पत्रांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेच्या कलमात बदल करण्यात आलेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कलम १८(१) संदर्भातील २६ फेब्रुवारी २०२६ च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावांचा समावेश आहे.

त्यामुळं कलम ६.७ ,१२ ३२ आणि ३६ संदर्भातील ठराव आणि बदला संदर्भातील कागदपत्र जमा करावीत, असं निवडणूक आयोगानं पत्रात म्हटलंय. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ आयोगाला वैध प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरला, तर अनेक मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमांनुसार करण्यात आल्या होत्या का? असे प्रश्न निवडणुक आयोगाने उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळेच्या मध्यंतरानंतर थरार! विद्यार्थ्याला निर्जनस्थळी नेऊन गळ्यावर अन् पोटावर वार

Maharashtra News Live Update: कोल्हापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थानात 60 कोटींचा घोटळा

Crime: लग्न मोडल्याचा सूड, तरुणाने मामाच्या १ वर्षांच्या बाळाचं अपहरण केलं; नंतर...

Bihar Ey-Election: भाजपचा ३५ वर्षांचा गड ३० दिवसात ढासळला; प्रशांत किशोर यांच्या विजयाची कारणं काय?

काँग्रेसच्या दोन आमदारांचा तडकाफडकी राजीनामा! मुख्यमंत्र्यांचा 'तो' निर्णय जिव्हारी लागला; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT