2029 Lok Sabha election polling stations expected to increase saam tv
महाराष्ट्र

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Lok Sabha Election: देशभरातील मतदान केंद्रांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०१९ मध्ये सुमारे १०.३७ लाख मतदान केंद्रे होती, तर २०२४ मध्ये ही संख्या वाढून सुमारे १०.५२ लाख झाली.

Bharat Jadhav

  • देशात सुमारे १५.३९ लाख मतदान केंद्रांची आवश्यकता भासू शकते.

  • २०२९ निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष मतदान केंद्रांची संख्या बदलू शकते.

  • निवडणूक आयोग २०२९ साठी आवश्यक मतदान आणि EVM पायाभूत सुविधांचे नियोजन

लोकसभा निवडणुकांना अजून वेळ असला तरी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने आपल्या पक्षात संघटनात्मक फेरबदल केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसही संघटनात्मक बदल करणार आहे. निवडणूक आयोगाकडूनही लोकसभेसाठी तयारी करण्यात येत असून मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाणार असल्याचा खुलासा आरटीआयमधून झालाय.

'इंडिया टुडे'ने माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत भारतीय निवडणूक आयोगाकडे देशातील सध्याच्या मतदान यंत्रांची संख्या तसेच २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवीन यंत्रे खरेदी करण्याच्या योजनांबाबत माहिती मागवली होती. त्याला निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील मतदानविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे.

आयोगानुसार, २०२९मध्ये देशात होणाऱ्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया १५.३८ लाख मतदान केंद्रात पार पडतील. ही संख्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या १०.५२ लाख मतदान केंद्राच्या तुलनेत ४६ टक्के जास्त असेन.

निवडणूक आयोगाकडे किती EVM?

निवडणूक आयोगाने आरटीआयमधून विचारण्यात आलेल्या उत्तरात ईव्हीएमबाबतही माहिती दिलीय. सध्या ३०.४८ लाख बॅलेट युनिट आणि २१.९२ लाख कंट्रोल यूनिट उपलब्ध आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांशी या आकडेवारीची तुलना केली तर त्यावेळी निवडणूक आयोगाकडे अंदाजे १४.८८ लाख बॅलट युनिट्स आणि ११.३० लाख कंट्रोल युनिट्स उपलब्ध होते. यावरून असे आढळून येईल की, गेल्या काही वर्षांत ईव्हीएमचा (EVMs) विद्यमान साठा लक्षणीयरीत्या वाढलाय.

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अंदाजे ३.५७ लाख बॅलेट युनिट्स आणि १.२५ लाख कंट्रोल युनिट्स खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. आयोगाने तितक्याच संख्येतील जुनी यंत्रे वापरातून काढून टाकण्याची योजनाही जाहीर केली आहे. नवीन ईव्हीएम खरेदी करून आयोग आपल्याकडील यंत्रांच्या एकूण संख्येत मोठी वाढ करण्याऐवजी, जुन्या यंत्रांच्या जागी नवीन यंत्रे आणण्याची तयारी करत आहे. म्हणजेच ३.५७ लाख बॅलट युनिट्स आणि १.२५ लाख कंट्रोल युनिट्सची ही खरेदी प्रामुख्याने जुन्या यंत्रांना बदलून त्याजागी नवीन यंत्रे बसवण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वर्ध्यातील रायपूर येथील वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचे मृत्यू प्रकरण

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोठा निर्णय, इतक्या दिवस मनाई आदेश लागू; अटी कोणत्या?

SCROLL FOR NEXT