सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापले ओंकार कदम
महाराष्ट्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापले

साताऱ्यात सध्या जिल्हामध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यात सध्या जिल्हामध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. खा.उदयनराजे आणि आ.शिवेंद्रराजे यांच्यात या वरून जोरदार शाब्दिक चकमक सुरू असतानाच तिकडे माण तालुक्यात माण बाजार समितीमध्ये आ.जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे हे एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याने नेमकं जिल्हाबँकेच्या पक्ष विरहित पॅनलमध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्कंठा लागून राहिली आहे.

हे देखील पहा-

आ. जयकुमार गोरे, शिवसेनेचे जिल्ह्यातील हेविवेट आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विशेष मर्जित असणारे शेखर गोरे, माजी आमदार सदाशिव पोळ यांचे चिरंजीव मनोज पोळ यांच्यात नेमकं कोण जिल्हाबँकेत एन्ट्री मारणार, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हाबँकेच्या सध्याच्या संचालक मंडळा विरोधात भाजप आ.जयकुमार गोरे यांनी संधी मिळेल, तेव्हा सडकून टीका केली आहे.

यामुळे राष्ट्रवादी आणि सध्याचे सर्वसमावेशक पॅनलच्या माध्यमातून जयकुमार गोरे याना तगडा आव्हान देण्यासाठी त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे नेते शेखर गोरे याना एकत्र घेऊन, पुढे जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. शेखर गोरे यांच्या माध्यमातून आमदार गोरेंना जिल्हाबँकेच्या बाहेर ठेवण्याचे स्वप्न राष्ट्रवादी पाहत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

SCROLL FOR NEXT