Satara Crime ओंकार कदम
महाराष्ट्र

संतापजनक! लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार; साताऱ्यातील खळबळजनक घटना

माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली अन्...

ओंकार कदम

सातारा: लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका पाचष्ट वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावरती बलात्कार केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली, ती ओरडेल म्हणून तिचे तोंड दाबले आणि घराच्या मागे अंधारात नेलं आणि तिच्यावर बळजबरी केली. सदर महिलेने नराधम आरोपीला विरोध केला असता त्यांने महिलेला मारहाणही केली.

तरिही पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने शारिरिक संबंध केले केल्याचं पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं असून या प्रकरणी पोलिसांनी (Police) एकाला अटक केली आहे.

दरम्यान या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल

Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT