Satara Constituency Saam TV
महाराष्ट्र

Satara Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येत नाही, तोपर्यंत पायात चपला घालणार नाही; वयोवृद्ध आजोबांचा निर्धार

Ruchika Jadhav

ओंकार कदम, सातारा

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगलीये. प्रत्येक उमेदवार आपल्याला जास्तीत जास्त मतं मिळावीत आणि विजय व्हावा यासाठी प्रचारसभा घेत आहेत. उमेदवारांचे समर्थक विविध पद्धतीने लोकांच्या भेटीगाठी घेत त्यांचा प्रचार करत आहेत. अशात सातारा लोकसभा मतदारसंघातून एक अजब प्रकार समोर आलाय. एका आजोबांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मोठा निर्धार केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते प्रचारासाठी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातील खटाव तालुक्यात असणाऱ्या विसापूर येथील भगवान शंकर साळुंखे हे आजोबा आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.

पायात चपला घालणार नाही

जोपर्यंत आमदार शशिकांत शिंदे निवडून येत नाहीत तोपर्यंत आपण पायात चपला घालणार नाही असा निर्धार या आजोबांनी केला आहे. त्यामुळे सध्या या भागात त्यांचा निर्धार चर्चेचा विषय बनलाय. सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत पोहोचला असला तरी हे आजोबा आमदार शशिकांत शिंदे यांचा प्रचार पायात चपला न घालता करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी देखील आपल्या मतदारसंघात प्रचार सभांना जोर लावला आहे. महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे सातारा लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. अशात आता आजोबांचा प्रचार उदयनराजे भोसलेंवर भारी पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT