धक्कादायक! वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

अज्ञात कारणाने वृद्ध शेतकरी दाम्पत्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : अज्ञात कारणाने वृद्ध शेतकरी दाम्पत्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोपट बाबूराव मुळे (वय- ६५ वर्षे), आणि सौ.कमल पोपट मुळे (वय- ५६ वर्षे , दोघे रा. खंडाळी ता. मोहोळ) अशी आत्महत्या केलेल्या पति- पत्नीचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोपट बाबूराव मुळे, आणि कमल पोपट मुळे हे पती- पत्नी गुरुवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात कारणाने घरामधून निघून गेले होते. यामुळे त्यांचा मुलगा अमर मुळे आणि चुलत भाऊ बाळू मुळे यांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरवात केली. मात्र, ते कुठेच मिळूून आले नाहीत.

हे देखील पहा-

दरम्यान, शुक्रवारी सकाळी हे दोघे पती- पत्नी शेतात टोमॅटोच्या पिका शेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. जवळ जाऊन बघितलं असत, त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते दोघे मृत झाले होते. घटनास्थळी कसल्या तरी कीटकनाशकाचा उग्र वास येत असल्यामुळे त्या दोघांनी अज्ञात कारणाने घरातून निघून जाऊन आत्महत्या केली असावी, अशी नातेवाईकांनमधून शंका व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी बाळू केरू मुळे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत आदलिंगे हे करत आहेत. मात्र, या वृद्ध दाम्पत्याने नेमक्या कोणत्या कारणामुळे विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. हे अद्याप समजू शकले नाही. यामुळे या आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खंडाळी सह परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: मंदिरात या ६ वस्तू दान करा, घरात येईल सुख-समृद्धी

Maratha Reservation: ...तर त्या नेत्यांवर बहिष्कार टाकू, लक्ष्मण हाकेंच्या धमकीला ओमराजे निंबाळकरांचे उत्तर; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

Palmistry: तुम्ही किती वर्ष जगणार? तुमच्या हातांवरील रेषांमध्ये दडलंय रहस्य, पाहा कसं पाहू शकता?

Ganpati Temple : गणेशोत्सवात गणपती मंदिरातील दान पेटीची चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

SCROLL FOR NEXT