Crime News Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! दारु पिण्यासाठी आई-वडिलांनी पैसै दिले नाही, मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

क्षुल्लक कारणावरुन कुटुंबातील वाद विकोपाला गेला, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

जयेश गावंडे

अकोला : कौटुंबिक कलह कोणत्या थराला पोहोचतील (Family Disputes) याचा अंदाज बांधणं अकोल्यातील (Akola Crime News) एका दुर्देवी घटनेमुळं कठीण बनलं आहे. क्षुल्लक कारणावरुन कुटुंबातील वाद विकोपाला जावून हत्या झालेच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. आई- वडिलांनी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही, याचा राग मनात धरुन रणधीरसिंह उल्हाससिंह चव्हाण लोखंडी शस्त्राने आपल्या जन्मदात्या माता-पित्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर मोठा भाऊ प्रितमसिंह याने रणधीरसिंहच्या हात्यातील शस्त्र हिसकावून त्याच्या शरीरावर वार केले. या हल्ल्यात रणधीरसिंहचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी प्रितमसिंह उल्हाससिंह चव्हाण (culprit arrested) याला मुर्तीजापूर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तीजापुर दर्यापूर रोडला लागून असलेल्या सिरसो गायरान या भागात राहणारा रणधीर सिंह उल्हास सिंह चव्हाण दारु पिण्यासाठी आई-वडिलांकडे पैसे मागत होता. मोठ्या भावाने आणि त्याच्या पालकांनी पैसै देण्यास नकार दिला. त्यानंतर रणधीर सिंह याने रागाच्या भरात धारधार शस्त्राने त्याच्या आई-वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी रणधीर सिंहचा मोठा भाऊप्रितमसिंह उल्हाससिंह चव्हाण याने त्याच्या हातातील शस्त्र हिसकावून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोविंद पांडव व उपनिरीक्षक सत्यजित मानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपी प्रितमसिंह उल्हाससिंह चव्हाण याला पोलिसांनी अटक केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT