Cracked farmland under harsh sunlight symbolizes the looming drought threat in Maharashtra due to El Niño impact. Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रावर दुष्काळाचं महासंकट? 1950 नंतरचा महाभंयकर 'एल निनो'? हाहाकार माजणार, बळीराजा कोलमडणार?

El Nino Impact Maharashtra Drought Risk Monsoon 2026: महाराष्ट्रावर महासंकट घोंघावतंय? जागतिक हवामानात मोठे फेरबदल घडवून आणणारा आणि भारतीय मान्सूनसाठी अत्यंत घातक मानला जाणारा ‘एल निनो’ प्रशांत महासागरात सक्रिय झालाय...महाराष्ट्रावरील घोंगावणाऱ्या महादुष्काळावरचा हा रिपोर्ट...

Suprim Maskar

जागतिक हवामानात मोठे फेरबदल घडवून आणणारा आणि भारतासाठी 'व्हिलन' मानला जाणारा ‘एल निनो’ प्रशांत महासागरात सक्रिय झालाय..अमेरिकेच्या ‘नोआ’ या नामांकित हवामान संस्थेच्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने यावर शिक्कामोर्तब केलयं...त्यामुळे भारतातल्या मान्सूनवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचं प्रमाण अनियमित होऊन शेतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे....

मान्सूनवर एल निनोचं संकट

प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा वाढल्यानं 'एल निनो' सक्रिय

यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा 63% अंदाज

भारतात मान्सूनवर विपरीत परिणाम होऊन पाऊस कमी किंवा अनियमित?

फेब्रुवारी 2027पर्यंत एल निनोचा प्रभाव राहण्याची 90% शक्यता

एल निनोमुळे 2027चा उन्हाळा अत्यंत तीव्र राहण्याचा अंदाज

दरम्यान या एल निनोमुळे महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार... पाहूयात...

महाराष्ट्रावर एल निनोचं महासंकट?

मान्सूनच्या आगमनासोबतच एल निनो सक्रिय झाल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. पाऊस अनियमित झाल्याने पिकांच्या पेरण्या उलटण्याची किंवा पिके जळून जाण्याची भीती आहे.

भारताची अर्थव्यवस्था आणि शेती पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरिपाच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते, ज्यामुळे अन्नधान्याची टंचाई ओढवूव महागाई वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान एल निनोमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या या संभाव्य दुष्काळी आणि हवामान संकटाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलीय. यासाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती करून बदलत्या हवामानानुसार कृषी विद्यापीठांच्या सल्ल्यानेच पेरण्या करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलयं...

जरी एल निनोचा प्रादेशिक परिणाम सर्वत्र सारखा नसला, तरी भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हा 'रेड अलर्ट' आहे. याआधी अतितीव्र स्वपरुपाच्या या एल निनोमुळे जगात अनेक ठिकाणी गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालयं.. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोजन, कमी पाण्यात येणारी पिकं आणि उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज अन् फंगल इन्फेक्शनचा त्रास होतोय? डॉक्टरांनी सांगितले ७ घरगुती सोपे उपाय

Sejal Pawar: KEM कॉलेज चिंदी आहे'; प्रणित मोरेच्या शोमध्ये 'नको ते' बोलणाऱ्या सेजल पवारचा जुना व्हिडिओ व्हायरल

shocking: सावत्र बापाचं राक्षसी कृत्य; अवघ्या १५०० रुपयांसाठी हातपाय बांधून चिमुकल्याला अमानुष मारहाण

राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाला राष्ट्रवादीचा नकार

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टी मंगळवारी नागपूरमध्ये आंदोलन करणार

SCROLL FOR NEXT