Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार

Eknath Shinde News In Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Saam Tv

भरत मोहळकर-

दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलीय.. त्यातच शिंदेंनी मुंबईतील बैठका रद्द करून दरे गावी जाण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आता शिंदे मोठा निर्णय घेण्याचे संकेत शिंदे गटाने दिलेत.. मात्र शिंदेंचा मोठा निर्णय काय असणार आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला मुक्काम सातारा जिल्ह्यातील दरे गावी हलवलाय. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे आणखीनच राज्याच्या राजकारणातली उत्सुकता वाढलीय.

कारण शिंदे जेव्हा जेव्हा त्यांच्या मूळ गावी जातात तेव्हा मोठा निर्णय़ घेतात असं शिरसाटांनी सांगितलंय. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणता मोठा निर्णय घेतात याबाबत चर्चेला उधाण आलंय. तर त्यांच्या गावी जाण्याची ठाकरे गटानं खिल्ली उडवलीय.

राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकानाथ शिंदेंनी आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यातच शिंदे गटाकडून एकनाथ शिंदेंच्या तब्बेतीचं कारण दिलं जातंय. शिंदेंना ताप आणि कणकण असल्याने ते दिवसभर कुणालाही भेटणार नसल्याचं सांगण्यात आलंय. दरे गावी जाऊन शिंदे कोणता निर्णय घेण्याची शक्यता आहे? पाहूयात.

यापूर्वीही एकनाथ शिंदे यांच्यापुढे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी दरे गावी जाऊन निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री शिंदे दरे गावाहून पुन्हा माघारी परतल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की दुसरा मोठा निर्णय घेणार याची राज्याला उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

SCROLL FOR NEXT