Chhagan Bhujbal, Eknath Shinde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री बदलाचा दावा; मंत्री छगन भुजबळ यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

Chhagan Bhujbal On CM Post Prediction : येत्या १५-२० दिवसांत मुख्य खुर्ची बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

Nandkumar Joshi

तबरेज शेख, नाशिक

Chhagan Bhujbal On CM Post Prediction : येत्या १५-२० दिवसांत म्हणजेच सप्टेंबरमध्ये राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, विशेषतः मुख्य खुर्ची बदलेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या दाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री तेच राहणार आहेत, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच, वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावला.

राज्यात वर्षभरापूर्वी सत्तांतर झालं. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आणि ते पुन्हा सत्तेत आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या सत्तांतराच्या नाट्याचा पडदा पडून वर्षे उलटत नाही, तोच पुन्हा राजकीय नाट्य घडलं. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी भाजप-शिंदेंना पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून सातत्याने शिंदेंवर टीका केली जाते. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार फार काळ सत्तेत राहणार नाही, असा दावा विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केला जातो.

काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नुकताच मोठा दावा केला. सप्टेंबरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊन मुख्य खुर्ची बदलेल, असं सांगितलं. त्यानंतर पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आता मुख्यमंत्री बदलाच्या दाव्यावर प्रतिदाव्यांची मालिका सुरू झाली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले होते. एकनाथ शिंदे हेच २०२४ पर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री बदलणार नाहीत. मुख्यमंत्री शिंदेच राहतील. उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच राहतील. आम्हीही मंत्री राहू, असे भुजबळ म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याबाबतही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाही आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या विचारांतून आम्हाला मार्गदर्शन मिळते. नाशिक भुजबळांचा बालेकिल्ला आहे आणि तो राहील, असंही ते म्हणाले.

पालकमंत्रिपद वाटपावरून मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. त्यावरही त्यांनी भाष्य केले. पालकमंत्रिपदावरून कोण नाराज आहे हे मला माहीत नाही. कामच इतके आहे की नाराज व्हायला वेळही नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत करा, असे आदेश बारामतीतील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जाते. त्यावर महाविकास आघाडी म्हणून त्यांना ते करावं लागतं, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

दादा भुसेंचीही टीका

विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर दादा भुसेंनीही टीकास्त्र सोडलं. स्वप्न पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारवर जनता खूश आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे वक्तव्य केले जाते. त्यांच्या मुख्य खुर्चीत बदल होऊ शकतो का, असा प्रतिप्रश्नच भुसेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

SCROLL FOR NEXT