Dasara Melava Shinde Vs Thackeray News Saam TV
महाराष्ट्र

दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांमध्ये राडा; शिंदेंच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटातील महिलांकडून चोप

नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला असून या घटनेचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Dasara Melava Latest Updates: नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला असून या घटनेचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिवाय शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्यांनी चोप दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आज मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येंने मुंबईकडे निघाले आहेत. तर अनेक आपआपली ताकद दाखवण्यासाठी गाड्यांचे ताफे घेऊन एकत्रीत मुंबईकडे रवाना झाले आहेत.

पाहा व्हिडीओ -

मात्र, दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नाशिक-मुंबई महामार्गाशेजारील शहापूर येथे मोठा राडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी चालत्या वाहनातून अश्लील इशारे केल्याचा आरोप ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांनी केला आहे.

शिवाय याच कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच चोप दिला असून या घटनेचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे मेळावा पार पडण्याच्या आधीच या मेळाव्यांना गालबोट लागल्याचं बोललं जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

New Income Tax Bill: नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, करदात्यांसाठी केले महत्त्वाचे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

SCROLL FOR NEXT