Eknath Shinde and Aaditya Thackeray engage in a heated exchange during the Maharashtra Assembly session. saam tv
महाराष्ट्र

ऑपरेशन टायगरनंतर एकनाथ शिंदे अन् ठाकरे आमने-सामने; विधानभवनात खडाजंगी

Eknath Shinde Aaditya Thackeray Assembly Clash Details: ऑपरेशन टायगरनंतर विधानभवनात शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आले. प्रश्नोत्तरांवरून जोरदार खडाजंगी, आरोप-प्रत्यारोपांनी सभागृह तापले.

Omkar Sonawane

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून सभागृहात पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सभागृहात लक्षवेधीच्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांकडून किंवा राज्यमंत्र्यांकडून उत्तर मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याआखात्यातरीत असलेले विभाग दुसऱ्या मंत्र्‍यांकडे सभागृहात उत्तर देण्यासाठी विभागून देतात. यावरून आदित्य ठाकरेनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. जी खाती रडून घेतली, त्या खात्याबाबत उत्तर द्यावे. फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर तसे लिहून द्यावे असे ठाकरे म्हणाले.

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांचा अक्षरशः समाचार घेतला. विरोधकांकडे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत, अशी टीका करत शिंदे यांनी सभागृहात विरोधी बाकांवर तोफ डागली. काल जो त्यांना जोर का झटका धीरे से लागला, त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि पुढे आणखी झटके बसणार आहेत, असा घणाघात करत त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज पूर्णपणे नियमांनुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिली आहे. तरीही प्रश्नांची उत्तरे ऐकण्याऐवजी गोंधळ घालणे आणि स्टंटबाजी करणे एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला आहे, अशी टीका त्यांनी केली.

विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायचे, ही विरोधकांची जुनी सवय आहे. प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT